काटेवाडी जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
पाथर्डी प्रतिनिधी:
शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेंच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी चि. प्रथमेश राजेंद्र ढाकणे या विद्यार्थ्याने ५० मीटर धावणे तसेच उंच उडी या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून काटेवाडी व खरवंडी कासार केंद्राची शान वाढवली आहे. तसेच लहान गट मुले कबड्डी या सांघिक खेळामध्ये काटेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्रदीपक प्रगतीमुळे खरवंडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पोळ तसेच गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांनी विद्यार्थी प्रथमेश आणि कबड्डी खेळातील सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक आणि अभिनंदन केले. प्रथमेशच्या या यशामुळे गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी ही त्याचे अभिनंदन केले.
प्रथमेशला हे यश मिळवण्यासाठी मुख्याध्यापक भिमराव पाखरे, उपाध्यापक रामदास खेडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.