महाराष्ट्र
15090
10
दादापाटील राजळे महाविद्यालय सेंटर ऑफ एक्सलन्स ने
By Admin
दादापाटील राजळे महाविद्यालय सेंटर ऑफ एक्सलन्स ने सन्मानित
पाथर्डी प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे मंगळवार दि.२५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील विविध महाविद्यालयांतून आदिनाथनगर येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाला करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत “सेंटर ऑफ एक्सलन्स” म्हणून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, डॉ. के.जी. गायकवाड, डॉ. आर.टी. घोलप, डॉ. ए.एच. देसाई, प्रा. सी.एन. पानसरे व श्री. आर.के. फलके यांनी विधान भवन, महाराष्ट्र राज्य येथील ग्रंथपाल श्री. बाबा वाघमारे, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर, मुंबईच्या संचालिका श्रीमती भावना पाटोळे, व्हाईस थेरपीस्ट श्रीमती सोनाली लोहार आणि करिअर कट्टाचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे यांचे समवेत सन्मान स्वीकारण्यात आला.
श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शक आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात जाण्याऐवजी महाविद्यालयातच मार्गदर्शन देण्याची यंत्रणा निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्षमतेनुसार करिअरच्या विविध वाटा निर्माण करणे व करिअरला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयामध्ये “करिअर कट्टा” उपक्रम राबविण्याची सूचना केली. त्यानुसार महाविद्यालयाला “सेंटर ऑफ एक्सलन्स” मिळाल्याने हा उद्देश साध्य झाला आहे.
महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागाच्या या विशेष यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ. आप्पासाहेब राजळे,आमदार मोनिकाताई राजीव राजळे, सचिव आर.जे. महाजन, विश्वस्त राहुलदादा राजळे,मार्गदर्शक जे.आर.पवार,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष शिवाजीराव राजळे व समितीचे सर्व सदस्य यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, कार्यालयीन अधिक्षक श्री. व्ही. बी. राजळे, करिअर कट्टाचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. के. जी. गायकवाड, तालुका समन्वयक डॉ. ए. आर. चौरपगार व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.
Tags :

