मनोज जरांगे यांनी उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा.- अंकुशराव डांभे पाटील
पाथर्डी- प्रतिनिधी
मनोज जरांगे यांनी सलग एक वर्ष उपोषण केले,उपोषणाने आरक्षणाचा मार्ग निघत नसून सरकारला मनोज जरांगे यांच्या जीवाची काळजी नाही,मराठा समाजाला आरक्षना पेक्षा जरांगे पाटील महत्वाचे आहे,त्यामुळे त्यांनी 17 सप्टेंबर चे उपोषण मागे घ्यावे,अशी मागणी सकल मराठा समाज आणि मराठा युवा संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे पाटील यांनी एका पत्रकाद्वारे विनंती केली आहे. प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आपल्या परिवारावर पाणी सोडलं आहे,आणि संपूर्ण मराठा समाजच आपल कुटुंब मानल आहे आणि म्हणून मराठा समाजाला त्यांची गरज आहे,महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजच त्यांच्या बरोबर आहे,ठराविक काही पक्षांचे दलाल स्वतः च्य्या स्वार्थासाठी नेत्यांना बाप मानत आहेत,आणि गरीब मराठा समाज यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत,परंतु गरजवंत मराठा त्यांना कधीही माफ करणार नाही,मराठा समाजाला आरक्षण आणि जरांगे पाटील आवश्यक आहे,सरकार मराठा समाजाचा विश्वासघात करत आहे,सरकारने मराठा आणि जरांगे पाटील यांच्या अंत पाहू नये,सत्ताधारी महायुती आहे,जबाबदारी त्यांची आहे विरोधी पक्ष यांचा आज विषय नाही महायुतीने आरक्षण दिले तर गरजवंत मराठा त्याचा नक्की विचार करेल परंतु सरकारने निवडणुकी अगोदर आरक्षण दिले पाहिजे नाहीतर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल ,सरकारने ओपोषणाची दखल घेऊन समाजालां आरक्षण देऊन जरां गे पाटलांनी उपोषणाचा मार्ग अवलंब करू नये अशी विनंती सकल मराठा समाज नगर जिल्हा आणि मराठा युवा संघर्ष समितीने केली आहे.