महाराष्ट्र
88234
10
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा शुभारंभ
By Admin
वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा शुभारंभ
पाथर्डी : अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारा श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सध्या चांगल्या अवस्थेत आहे. इथेनॉल प्रकल्प चांगल्या प्रकारे सुरू झालाय. भविष्यात आणखी उपपदार्थ निर्मितीचे
प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे. ऊसउत्पादकांनी वृद्धेश्वरला ऊस घालावा. तीन हजार रुपये टनाला भाव देण्यात येईल. ऊसउत्पादकांनी श्री वृद्धेश्वर कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
श्रीवृद्धेश्वर साखर कारखान्याच्या ४७ व्या गळीत हंगामाच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात राजळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष रामकिसन काकडे होते. या वेळी ज्येष्ठ नेते कारखान्याचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब राजळे, उद्धराव वाघ, राहुल राजळे, काशिनाथ पाटील लवांडे, बापुसाहेब भोसले, धनंजय बडे, अभय आव्हाड, नारायण काकडे, श्रीकांत मिसाळ, कुशीनाथ बर्डे, सुभाष बर्डे, मंगल कोकाटे, सिंधुताई जायभाये, सिंधुताई साठे, नितीन कीर्तने, सुभाष ताठे, विजय आव्हाड, सुभाष बुधवंत, यशवंत गवळी, नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली आहे. निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक असलेली बहुतेक भाजपाचे कार्यकर्त कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. भावी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहून आनंद वाटल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांनी सांगताच एकच हशा पिकला.
कार्यकारी संचालक नितीन शिंदे तसेच कारखाना कर्मचारी,सभासद तसेच शेतकरी उपस्थित होते. या वेळी बोलताना राजळे म्हणाल्या, यावर्षी पावसाने मोठे नुकसान केले आहे.
शेतीपिके वाया गेली आहेत. सरकारने नुकसानीचे अनुदान दिले आहे. कारखान्याने अनेक मशिनरीची तांत्रिक कामे नव्याने केली आहेत. सहा लाख मेट्रिक टनाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. खासगी काखान्यांशी स्पर्धा करावयाची असून, ते आवाहन पेलावे लागेल. कारखान्याचे काम
सामुहिकपणे करून ऊस गाळपासाठी मिळवायचा आहे. ऊसदर वाढीचे आमिष दाखविले जाईल. मात्र, अडचणीच्या काळात कोणता कारखाना कामाला येतो, हे पाहिले पाहिजे. ऊसउत्पादकांनी वृद्धेश्वरलाच ऊस देऊन सहकार्य करावे. जिल्हा सहकारी बँकेने कर्ज दिले आहे, ते वेळेत फेडण्याचे काम करावे लागेल. आणखी काही प्रकल्प विचाराधीन आहेत. भविष्यात नक्की ती कामे पूर्ण केली जातील. संचालक राहुल राजळे यांनी प्रास्ताविक केले. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले.
Tags :
88234
10





