महाराष्ट्र
फसवणूकीला आळा बसण्यासाठी मानांकनाचे महत्व समजून घ्यावे-
By Admin
फसवणूकीला आळा बसण्यासाठी मानांकनाचे महत्व समजून घ्यावे- प्राचार्य अशोक दौंड
श्री तिलोक जैन विद्यालयात स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन स्पर्धा
पाथर्डी प्रतिनिधी:
शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात केंद्र सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्या अंतर्गत बी.आय. एस. क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे .'भारत की आजादी का अमृत महोत्सव' (७५ वर्षे) निमित्त देशातील प्रत्येक राज्यात सदर क्लब माध्यमिक शाळा, महाविद्यालय तसेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत .यास अनुसरून श्री तिलोक जैन विद्यालयात - एस . सी . ८९२ क्रमांकाचा स्टॅण्डर्ड क्लब स्थापन करण्यात आलेला आहे.
या क्लब अंतर्गत सध्या देशभर स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन चे आयोजन केले जात आहे. या अनुषंगाने विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली क्लब चे मेंटॉर सुनील कटारिया, को - मेंटॉर श्रीमती संध्या पालवे यांनी ३० डिसेबर रोजी विद्यालयात सदर स्पर्धेचे आयोजन केले.
क्लब मधील जवळपास ६० विद्यार्थ्यांनी स्टॅंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन स्पर्धेत सहभाग नोंदवला. या मध्ये प्रथम विद्यार्थ्यांची ग्राहक म्हणून बाजारात कुठेही फसवणूक होणार नाही, या अनुषंगाने विविध प्रकारचे स्टॅंडर्ड कसे ठरवले जातात, या विषयी क्लब चे मेंटॉर सुनिल कटारिया व को-मेंटॉर श्रीमती संध्या पालवे यांनी ओरिएंटेशन कोर्स घेऊन माहिती दिली. त्या नंतर पेन्सिल या विषयावर सर्व विद्यार्थ्यांनी स्टॅंडर्ड रायटिंग केले.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देखील प्रदान करण्यात आले. या पूर्वी देखील या क्लबच्या माध्यमातून ग्राहक हिताच्या दृष्टीने अनेक योजना विद्यालयाने राबवल्या आहेत. भारतीय मानक ब्युरो हे भारतातील सर्व उत्पादकांच्या उत्पादनांना आय. एस.आय.मार्क सर्टिफिकेशन देते तसेच भारतीय उत्पादनांचे मानांकन ठरवते. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल लायसन्स अँप्रोव्हड करते. या क्लब स्थापनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना, समाजातील नागरीकांना स्टॅण्डर्डस किंवा मानांकनाचे महत्व कळावे तसेच मेक इन इंडिया अंतर्गत सर्व प्रकारच्या कच्चा व पक्या मालाचे उत्पादन भारतातच व्हावे, हा आहे.
बाजारातील आय.एस.ओ. किंवा आय.एस.आय. मार्क, हॉलमार्किंग उत्पादने इ. उत्पादने खरेदी करते वेळी ग्राहक म्हणून भारतीय नागरिकांची फसवणूक होऊ नये हा आहे. या अनुषंगाने आज या अभियानात क्लब मधील सदस्यांनी स्टॅंडर्ड रायटिंग स्पर्धेबरोबरच बी.आय.एस. केअर ॲप विषयी देखील सविस्तर माहिती दिली.हे अॅप कसे वापरावे, खरेदी केलेल्या वस्तू आय. एस.आय.मार्क, हॉलमार्किंग च्या आहेत की नाही, सोने, मोबाईल, चार्जर , हेल्मेट,गॅस सिलिंडर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या सह दैनंदिन जीवनातील इतर अनेक वस्तू खरेदी करतांना त्याची शुद्धता योग्य आहे की नाही,सदर उत्पादन ॲप्रुव्ह केलेले आहे का,त्याची गुणवत्ता योग्य आहे का, हे कसे ओळखावे याचे सविस्तर सादरीकरण केले.
यावेळी प्राचार्य अशोक दौंड यांनी अध्यक्षपदावरून बोलतांना भविष्यात या क्लबच्या माध्यमातून विविध शाळेत परीपाठावेळी तसेच समाजात, विविध शासकीय कार्यालयात इ.ठिकाणी जनजागृती करण्याविषयी सुचवले. त्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात ग्राहक म्हणून कुणाचीही फसवणूक होणार नाही या दृष्टीने कार्य करावे, असे प्रतिपादन केले.
या वेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक दिलावर फकीर, उच्च माध्यमिक विभागाचे विभागप्रमुख सुधाकर सातपुते, बी.आय. एस. चे मेंटॉर सुनिल कटारिया, को - मेंटॉर श्रीमती संध्या पालवे तसेच विद्यालयातील नववी ते बारावीचे क्लबचे ६० विद्यार्थी उपस्थित होते.
अशा प्रकारचा सामाजिक हिताचा उपक्रम राबवल्याबद्दल संस्थेचे सचिव सतिश गुगळे व संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी देखील सर्वांचे विशेष अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेंटॉर सुनिल कटारिया यांनी केले तर आभार को - मेंटॉर श्रीमती संध्या पालवे यांनी मानून बी. आय. एस. थीम सॉगने इ. ११ वी च्या विद्यार्थीनींनी सर्वांचे स्वागत केले.अशा प्रकारे सदर उपक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.या उपक्रमाचे शहरातील नागरीकांकडून देखील विशेष कौतुक होत आहे.
Tags :
58620
10