सिंदफनानदी किनारी भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या हस्ते बंधा-याचे भूमीपूजन
By Admin
सिंदफणानदी किनारी भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या हस्ते बंधाऱ्याचे भूमिपूजन
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील मायंबा देवस्थानच्या मागे सिंदफणा बंधाऱ्याचे भूमिपूजन पाथर्डी चे भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
भालगाव येथील सिंदफणा बंधाऱ्याचे भूमिपूजन कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करून करण्यात आले. माणिक खेडकर यांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच जगुनाना खेडकर, गहिनीनाथ खेडकर गुरुजी, तुकाराम खेडकर, संजय बेद्रे, गणेश सुपेकर, सचिन खेडकर, एकनाथ खेडकर, शिवनाथ मेजर सुपेकर, ग्रामपंचायत सदस्य केशव कासुळे, वसंत खेडकर, सुरेश चव्हाण, पांडुरंग खरमाटे, जनार्दन खरमाटे, दत्तू खरमाटे, भीमराव कासुळे, बाबू मराडे, राजू सानप आदींची उपस्थिती होती.
यासंदर्भात माणिक खेडकर यांनी म्हटले आहे की, सध्यातरी कोठूनही पाणी येण्याची शक्यता नाही, याचा विचार करून पाणी साठवण क्षमता वाढविणे तर आवश्यक आहे. त्यासाठी भालगावच्या सरपंच डॉ.मनोरमा खेडकर यांनी २०१८-२०१९ मध्ये सिंदफणा नदीवर के. टी बंधारे बांधण्यासाठी भालगाव ग्रामपंचायत, झापेवाडी ग्रामपंचायत, येळंब ग्रामपंचायत यांच्या ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन भालगाव ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करून आमदार मोनिका राजळे यांची शिफारस घेऊन हा प्रस्ताव मा. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सादर केल्यानंतर त्यांनी या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागास निर्देश दिले. त्यानंतर त्याचा पाठपुरावा करून शासकीय विभागाकडून सर्वे करून घेऊन या नदीवर सात बंधाऱ्याचे प्रस्ताव तयार केले. त्याचा प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांनी व मी सातत्याने पाठपुरावा करून सात पैकी आत्तापर्यंत तीन बंधारे मंजूर करून घेतले. त्यापैकी एका बंधाऱ्याचे काम दीड वर्षापूर्वी पूर्ण झाले असून दोन बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येत आहेत.
दरम्यान आमदार मोनिका राजळे ह्या काही कारणास्तव येऊ न शकल्याने भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे भूमिपूजनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या बंधाऱ्याचे प्रत्यक्ष काम दोन-तीन दिवसात सुरू होईल. उर्वरित चार बंधाऱ्याचासाठी ही शासनाकडे पाठपुरावा सुरू असून कोव्हिडच्या संकटामुळे बंधाऱ्याची मंजुरी प्रलंबित आहेत.

