पाथर्डी तालुक्यातील 'या' देवस्थानच्या वतीने शेवगाव व पाथर्डी तालुक्या करिता 5000 रॅपिड टेस्ट किट मोफत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 13 मे 2021 , गुरुवार
शेवगाव पाथर्डी तालुक्यात कोरना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढता फैलाव रोखण्यासाठी हॉटस्पॉट झालेल्या गावांमध्ये तातडीने युद्धपातळीवर तपासणी करून बाधित रुग्ण शोध व त्यांचे विलगीकरण करण्यासाठी व कोरना साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाला हव्या तेवढ्या रॅपिड टेस्ट किट उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. त्याकरिता आमदार मोनिका राजळे यांनी मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट ला पाथर्डी व शेवगाव तालुक्यासाठी रॅपिड टेस्ट देण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार आज कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने 5000 रॅपिड टेस्ट किट प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.
मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांच्या हस्ते पाथर्डी -शेवगावचे प्रांत अधिकारी देवदत्त केकाण यांच्या कडे ह्या कोरोना चाचणीच्या किट पाथर्डी तहसिल कार्यालयात सुपूर्त करण्यात आला. यावेळी तहसिलदार शाम वाडकर,नायब तहसिलदार पंकज नेवसे,जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे ,आमदार मोनिका राजळे यांचे स्वीय सहाय्यक सुरेश बाबर ,भाजपाचे तालुकाउपाध्यक्ष गोकुळ दौंड,नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे ,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,मढी देवस्थानचे कोषाध्यक्ष बबन उर्फ राधाकिसन मरकड,विश्वस्त तथा उपसरपंच रवींद्र आरोळे,आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक कराळे,अजय भंडारी,सुभाष केकाण,भाग्येश मरकड ,भानुदास मरकड,बाबासाहेब मरकड,अविनाश मरकड,पाराजी मरकड,देवस्थानचे मुख्य कार्यकरीधिकारी अशोक पवार आदी उपस्थित होते.प्रशासनाला दिलेल्या या मदतीसाठी आमदार मोनिका राजळे यांनी सहकार्य केले आहे.त्याच प्रमाणे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना सॅनिटायझर ,मास्क ,फेस शेड पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.