महाराष्ट्र
नेवासे- शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाला ज्ञानेश्वर ऊसतोडणी कामगारांकडून पैशाची मागणी
By Admin
नेवासे- शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाला ज्ञानेश्वर ऊसतोडणी कामगारांकडून ऊसतोडण्यासाठी पैशाची मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
300 रुपये टायरगाडी दया तरच उसतोडु
एक खेप करून ऊसतोडणी केली बंद
नेवासे तालुक्यातील ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या भेंडे गटातील गट नंबर 228 मधील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रावसाहेब कावरे यांच्या कुकाने येथील यांचा ऊसतोडणी साठी टायर गाडी लेबर देण्यात आले असून त्यांनी 300 टायरगाडी खेपेला दया नाहींतर, आम्ही ऊस तोडणार नाही असा दम देत एक खेप घेऊन गेले मात्र दुसऱ्या खेपेला आले नसल्याने
उस तोडणीसाठी मंजुराकडून शेतकऱ्यांची कारखाना व्यवस्थापणा समोर लुट चालू असून याकडे कारखाना व्यस्थापन सपशेल डोळेझाक करत असल्याचा आरोप श्री. कावरे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे. साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होऊन 3 ते 4 महिने होत आले असून ऊसतोडणी साठी शेतकऱ्यांना पैसे देण्याची वेळ आली आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांना पहिली उचल देण्यासाठी ऊस तुटल्यानंतर महिना-दोन महिन्यांनीच्या पुढे कालावधी लागत आहे त्यातच कारखाना सुरु होऊन तब्बल 3-4 महिन्याचा कालावधी होत आल्याने उस तोडणी व वाहतूक दारांनी थेट खंडणीस्वरूप पैसे मागायला सुरुवात केली आहे. साखर कारखान्याच्या व्यवस्थापना समोर हे ऊस तोडणी कामगार पैसे घेत आहेत. तरी देखील शेतकऱ्यांना ऊस तोडणी कामगाराचे पाय धरण्याची वेळ आली आहे. याकडे कारखाना व्यवस्थापन सुद्धा डोळेझाक करत आहे यामुळे सध्या शेतकरी ऊस लावायला नाही तर ऊस घालायला शिका असे एकमेका मध्ये कुबुजत आहेत.
--२०१२ च्या करारानुसार तोडणी मजुरांनी शेतकऱ्यांच्या उसाची प्लॉटपासून १०० मीटर उसाची वाहतूक करायची अट आहे. तसेच उसाचे ५० टक्के वाडे ऊस उत्पादकाला देण्याची अट आहे. चहा नाष्टा जेवण असा मोबदला शेतकऱ्यांकडे मागायचा नाही तोडणी तळां बरोबर करायची त्याच बरोबर वाहनाच्या ड्रायवहरच्या जेवणाची चहापाण्याची सोय वाहन मालकांनी करायची पण यातील एकही अट पाळली जात नाही ऊस मालकाला त्याचच उसाचे वाडे विकत घ्यावे लागतात. उस प्लॉट बाहेर सोडाच पण प्रत्येक सरीला वाहन लागले पाहिजे तरच उसाला कोयता लावणार हि अट सध्या ला आहे फडात गाडी भरली तरच ऊस तुटणार एकरी पाच हजार ऊस खराब दिसला तर दहा हजार रुपये आणि वाहन चालकाला खेपी ला 200-300 रुपये हा खंडनीचा दर फिक्स झाला आहे शिवाय ट्रक, ट्रकटर ड्रायव्हरला दोन वेळचे जेवण हे देखील शेतकऱ्यांकडेच असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याकडे मात्र कारखाना व्यस्थापन का लक्ष देत नाही हा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे.बिचारा ऊस उत्पादक शेतकरी मड्याप्रमाणे उस शेतात ठेवता येत नाही म्हणून मुकाट्याने हा अन्याय सहन करतो ? कारखाना व्यवस्था पणाच्या विरोधात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साखर आयुक्तांकडे तक्रार करून मुकादम व शेतकी अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे कावरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
रावसाहेब कावरे यांची जमीन ज्ञानेश्वर करखान्या पासून हाकेच्या अंतरावर असून कारखान्याचे मळी चे दूषित पाण्याचा ओढा वाहत असल्याने त्यांच्या शेततील बोअरवेल विहिरी चे पाणी व जमिनीचा पोत खराब होऊन उत्पन्न घटले त्यातच कारखाना ऊस तोडायला जवळजवळ म्हणून उशीर करत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे रावसाहेब कावरे यांनी सांगितले
Tags :
18757
10