प्रदिप वायकर यांची MPSC परीक्षेतून कौशल्य विकास अधिकारी निवड झाल्याबद्दल सत्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील माळी बाभूळगावचे भुषण
चि. प्रदीप अशोक वायकर यांची डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (MPSC) अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत OBC category मध्ये 34 वा क्रमांक मिळविला .व त्यांची कौशल्य विकास अधिकारी( skill development officer)म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा माळी बाभुळगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला या वेळी ग्रामपंचायत सदस्य मा.गणेश दादा वायकर, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन वायकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन कोलते, विष्णू कोलते, अशोक वायकर मेजर , मच्छिंद्र वायकर, संतराम वायकर मेजर, यादव वाळके, सुरेश वाळके, ठाणे पोलीस महेश वायकर, ठाणे पोलिस दत्तात्रय सातपुते, इंजिनीयर प्रवीण वायकर, विशाल वाळके ,वैभव वायकर आदी ग्रामस्थ युवा बांधव उपस्थित होते. सर्व गावातून व तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.