महिला वाहकास शिवीगाळ व दमदाटी करणे पडले चांगलेच महागात
शेवगाव- प्रतिनिधी
१८ जून २०१४ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे प्रवासी घेण्यासाठी बस थांबली होती. यावेळी रिक्षातून उतरून काही प्रवासी बसमध्ये बसले.
याचाच राग येऊन एसटी बस वाहक प्रमिला आश्रुबा पालवे यांना शिवीगाळ करत दमदाटी केली.या गुन्ह्याचे शेवगाव पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
समोर आलेले साक्षी, पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अरविंद योसेफ कांबळे (वय २२), बापू चंद्रभान चव्हाण (वय २७ रा. दोघे शहर टाकळी ता. शेवगाव) व समीर बबन सय्यद (वय २७, रा.आंत्रे ता. नेवासा) आरोपींना शिक्षा ठोठावली.
या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने ॲड.
जी.के. मुळे यांनी काम पाहिले.