फॉर्च्युनर कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाटा येथे फॉरर्च्युनर कारने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत संकेत लक्ष्मण पुंड (वय १९) हा युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार (दि.२९) रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारस घडली.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, मृत संकेत पुंड हा आपल्या आत्याला सोडविण्यासाठी माळीचिंचोरा फाटा येथे आलेला होता. आत्याला सोडवून जात असतांना औरंगाबादहून-नगरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील फॉर्च्युनर कारने दुचाकीवर असलेल्या संकेत पुंड याला जोराची धडक दिल्याने संकेत हा युवक या अपघातात जागीच ठार झाला याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात राञी उशीराने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.