पाथर्डी तालुक्यात 'या' गावात विद्यार्थिनीची छेड; पोलिसात गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : तालुक्यातील एका विद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीची शाळा सुटल्यानंतर घरी जाताना वाटेत अडवून तिची छेड करणार्याच्या विरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेतील तिघेही फरार असून, याबाबत मुलीच्या आईने पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
यात म्हटले की, बुधवारी (दि.20) सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी येत असताना करंजी येथील काही तरुणांनी तिला रस्त्यात आडवून तिची छेड काढली आणि पळवून नेवू असे म्हणत तुझ्या विरोधात जातीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद म्हंटले आहे.