सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अत्यावश्यक खड्डे बुजवणाऱ्या मजुराच्या टीम मध्ये बालकामगार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव : शेवगाव बांधकाम विभागाच्या अत्यावश्यक खड्डे बुजवणाऱ्या मजुराच्या टीम मध्ये बालकामगार काम करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काँग्रेस संजय नांगरे यांनी शाळकरी मुलांच्या केलेल्या आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांच्या तोंडाला काळे फासण्याचे तोंडी इशारा दिल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या बांधकाम विभागाने ऐन दिवाळीच्या सणामध्ये शेवगाव शहरातील व शेवगाव शहरांमधून जाणाऱ्या राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. परंतु या खड्डे बुजवणाऱ्या मजुरांच्या टीम मध्ये बालकामगार असल्याची धक्कादायक बाब मी पुण्यनगरीच्या प्रतिनिधींनी उघड केली. याबाबत संबंधित बालमजुराला आमच्या प्रतिनिधीने विचारले असता त्याने दहावीच शिकत असल्याचे सांगितले. तसेच गावाचे नावही सांगितले. याबाबतचा व्हिडिओ आमच्या प्रतिनिधीने काढलेला असून याची चौकशी व्हावी अशी मागणी ही यावेळी नागरिकांमधून होत आहे.
याबाबत बालकामगारांच्या संबंधित काही तक्रारी असल्यास आमच्या सेंट्रल 10 98 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून याबाबत माहिती द्यावी. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना याविषयी लेखी जाब विचारला जाईल.
महेश सूर्यवंशी, बालकामगार केंद्र समन्वयक, अहमदनगर
मुकादमकडून साईटअप करण्याचा प्रयत्न
याबाबत संबंधित बांधकाम विभागाचे कामावर उपस्थित असलेले मुकादम यांना याबाबत विचारले असता त्यांनी या बालकामगारांना करण्याचा प्रयत्न केला. व उद्यापासून त्यांना कामावर येऊ नका असे आम्ही त्यांना सांगू असे म्हटले.