शेवगाव- 'या' गावात गाळ काढल्याने वाढला पाणीसाठा;अन् शाळा डिजीटल झाली
By Admin
शेवगाव- 'या' गावात गाळ काढल्याने वाढला पाणीसाठा;अन् शाळा डिजीटल झाली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बु. गावाने कृतिशील व विधायक गाव अशी ओळख निर्माण केली आहे. श्री गणेशाची स्वयंभू निद्रिस्त मूर्ती असलेले वैशिष्ट्यपूर्ण मंदिर असल्याने गावाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकोपा, टपरीमुक्त अभियान, ग्रामस्वच्छता, बचत गट चळवळ, वृक्ष लागवड, जलसंधारण आदी विविध उपक्रमांमधून आव्हाणे बुद्रुक (जि.
नगर जिल्ह्यातील शेवगाव हा दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे. तालुक्यातील काही गावांनी लोकसहभागातून विविध उपक्रम राबवून विकासाला दिशा दिली. सव्वातीन हजार लोकसंख्येचे आव्हाणे बुद्रुक हे त्यातीलच उपक्रमशील गाव आहे. येथे लोकनियुक्त सरपंचांसह ११ ग्रामपंचायत सदस्य आहेत. ग्रामस्थांसह माजी सरपंच संजय कोळगे, विद्यमान लोकनियुक्त सरपंच संगीता प्रतापराव कोळगे, उपसरपंच फातीमाबी गुलाब पठाण, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक के. डी. अकोलकर यांचे योगदान गावाला लाभले आहे, तर ज्येष्ठ नागरिक वसंतदेवा भालेराव, रामदास पाटील कोळगे, कांता मुटकुळे, मोहनराव कोळगे, बापूसाहेब महाजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. टपरीमुक्त अभियान गावात विविध साहित्य विक्रीच्या ७५ पर्यंत टपऱ्या होत्या. त्यातून शाश्वत उत्पन्न, रोजगाराची हमी नाही. त्यामुळे तरुणांना रोजगार, व्यवसायासाठी
हक्काची जागा आणि ग्रामपंचायतीलाही उत्पन्न मिळावे यासाठी माजी सरपंच संजय कोळगे यांनी पुढाकार घेतला. त्यातून टपरीमुक्त गाव अभियान उपक्रम राबवला. माजी आमदार नरेंद्र घुले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले व पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले यांनीही उपक्रमाला हातभार लावला. आता ग्रामपंचायतीद्वारे ४४ व्यावसायिक गाळे बांधून टपरीचालक तरुणांना ते माफक दरात उपलब्ध करून दिले जात आहेत. व्यसनमुक्त अभियानही यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाणीपातळीत वाढ शिवारातील नदीवर पंचवीस वर्षांपूर्वीचे दोन बंधारे आहेत तीन वर्षांपूर्वी लोकसहभागातून दोन्ही बंधाऱ्यातील गाळ काढला. तो शेतांत पसरल्याने शेती सुपीक झाली. पाणी साठवण क्षमता वाढली. दोन वर्षांपासून भागात मुबलक पाऊस होत असल्याने शिवारातील पाणीपातळी वाढली. शेजारील आव्हाणे खुर्द गावशिवारालाही या कामाचा फायदा झाला. पूर्वी हंगामी अन्नधान्य व भुसारी पिके होत. आता उसासह फळबागा, कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. आव्हाणे खुर्दचे लागवड क्षेत्र १३५८ एकर असून त्यातील
७९८ हेक्टरवर ऊस आहे. दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा आहे. गावातील ठळक उपक्रम
आव्हाणे बुद्रुकची लोकसंख्या सव्वातीन हजार व कुटुंबे ५३८. प्रत्येकाकडे वैयक्तिक शौचालये.
बारा वर्षापासून त्यांचा वापर.
सन २००७ मध्ये गाव हागणदारीमुक्त. संपूर्ण स्वच्छता अभियान राबवले जाते. ग्रामसभांतून निर्णय घेतले जातात.
गावांतील मोकळ्या जागा, चौक व अन्य ठिकाणी अडीच हजार झाडांची लागवड. ती जगवण्यावरही भर. रस्त्याच्या दुतर्फा बिहार पॅटर्ननुसार लावलेली झाडे जगवण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर.
रोजगार हमी योजनेतून झाडांची देखभाल.
तीनशेपेक्षा अधिक आर्थिक गरीब, निराधार, भूमिहीनांना श्रावणबाळ योजनेतून मानधन, तर २७५
कुटुंबांना घरकुलांचा लाभ.
महिला सक्षमीकरणासाठी दहा वर्षांपासून टप्प्याटप्प्याने २० महिला बचत गट. त्यांना तीस लाखांपेक्षा अधिक कर्ज मिळाले.
जिल्हा परिषदेची मुख्य शाळा तर दोन वस्तीशाळा. संगणकासह शालेय उपक्रमासाठी तरुण, नागरिकांकडून लोकवर्गणीद्वारे शाळेचे सुशोभीकरण.
निद्रिस्त स्वयंभू गणपती मंदिर, महानुभव पंथाचे गुरू चक्रधर स्वामी यांनी भेट दिलेले दत्त मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी, हनुमान, राणूबाई देवी, लक्ष्मीमाता, महादेव मंदिर आदींच्या विकासासाठी लोकवर्गणीतून पुढाकार.
जलजीवन मिशन'मधून नवी योजना. नागरिकांच्या प्रतिसादामुळे पाणी, करवसुलीवरही आव्हाणे गाव आघाडीवर. पाणी शुद्धीकरण प्रकल्प देण्याची गावकऱ्यांकडून अपेक्षा.
पंचायत समिती सदस्य मनीषा कोळगे यांच्या पुढाकारातून दोन प्रमुख चौकांचे सुशोभीकरण काम मंजूर.
आठ वर्षांपूर्वी १२ लाख रुपये खर्च करून स्मशानभूमी सुशोभीकरण. आता वृक्षारोपण, जिल्हा परिषदेच्या निधीतून पेव्हिंग ब्लॉक्स बसवण्याचे काम सुरू. अंतर्गत सिमेंट रस्ते.
मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, व्यसनमुक्ती, क्रीडा स्पर्धा यांसारखे उपक्रम दहा वर्षांपासून राबवले जातात.
तरुण तसेच बचतगटातील महिलांना भरीव आणि कायम स्वरूपी रोजगार मिळावा यासाठी शेतीवर आधारित सर्वानुमते प्रक्रिया उद्योग उभारण्याचा गावकऱ्यांचा संकल्प.
निद्रिस्त गणपतीचे एकमेव मंदिर गावात निद्रिस्त
अवस्थेतील स्वयंभू गणपतीचे असलेले मंदिर भारतातील एकमेव असावे. तीर्थक्षेत्र क वर्गात समाविष्ट असलेले हे देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. लोकवर्गणी व सरकारी निधीतून मंदिराचा विकास झाला आहे. मंदिराचे पुजारी वसंत पुरुषोत्तम भालेराव म्हणाले, की पूर्वी गावातील दादोबा देव गोसावी मोरगावच्या गणपतीला दर चतुर्थीला जात. एकदा पावसाळ्यात मोरगावजवळील कऱ्हा नदीला पाणी आल्याने ते अडकून पडले. लोकांनी त्यांची सुटका केली. पुढे गावातील शेतात नांगरट सुरू असताना निद्रिस्त गणेशाची मूर्ती आढळली. तेथेच मूर्तीची प्रतिष्ठापणा करून हेमाडपंथी मंदिर व परिसर विकास झाला. गणेश जयंतीनंतर येणाऱ्या चतुर्थीला मोठी यात्रा भरते. आव्हाणे बुद्रुकचा गौरव
संपूर्ण स्वच्छता अभियान, हागदारीमुक्त गाव अभियानाचा निर्मलग्राम पुरस्कार (२००८)
तंटामुक्त गाव पुरस्कार (२००८)
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (२०११)
स्मार्ट ग्राम पुरस्कार (२०१८-१९)