पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची कराडांच्या कार्यक्रमाकडे पाठ; निम्म्याहून अधिक रिकाम्या खुर्च्या
By Admin
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची कराडांच्या कार्यक्रमाकडे पाठ; निम्म्याहून अधिक रिकाम्या खुर्च्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा आज शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचा दौरा होता, भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
परंतु या दौऱ्याकडे पंकजा मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज मुंडे समर्थकांनी या कार्यक्रमावर अघोषीत बहिष्कार टाकल्याचे दिसत होते.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा आज शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचा दौरा होता, भाजपच्या वतीने सेवा पंधरवडा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परंतु या दौऱ्याकडे पंकजा मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज मुंडे समर्थकांनी या कार्यक्रमावर अघोषीत बहिष्कार टाकल्याचे दिसत होते. कार्यक्रमांमध्ये मोकळ्या खुर्च्या मोठ्या प्रमाणात होत्या. तसेच या कार्यक्रमातून मध्येच महिला उठून चाललेल्याही दिसत होत्या. मतदारसंघाचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष असताना हा प्रकार घडल्यामुळे तालुक्यामध्ये एकच चर्चा सुरु आहे.
केंद्र सरकारच्या शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबासाठी भरपूर योजना आहेत. मात्र त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहचण्याची गरज आहे. निती, नियत आणि इरादा पक्का असल्यास काहीही अशक्य नाही. या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिकवणीवर पक्षाची वाटचाल सुरु आहे. असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमीत्त भाजपच्या वतीने आयोजीत सेवा पंधरवाडा अभियान समारोप प्रसंगी शेवगाव येथील कार्यक्रमामध्ये कराड बोलत होते.
यावेळी डॉ.कराड म्हणाले की, केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य मिळत आहे. तर ठराविक लोकांसाठी यापूर्वी असलेल्या राष्ट्रीयकृत बँका आता सर्वसामान्य नागरीकांसाठी झालेल्या असून, ४६ कोटी ७० लाख जनधन खातेदार लाभ घेत आहेत. प्रधानमंत्री किसान योजनेतून ११ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केली जात आहे. तर लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर पैसा जमा होत असल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत नाही. त्याकरीता आधार व मोबाईल क्रमांक खात्याला जोडलेला आहे. या मतदार संघात राष्ट्रीयकृत बँकांचे जाळे निर्माण करुन नाबार्ड अंतर्गत येणाऱ्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देवू, असे आश्वासन त्यांनी दिले.