राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर कारवाई करणेबाबत तहसिलदार यांना निवेदन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुका खरेदी विक्रीच्या पंपावर (दि.23) रोजी संध्याकाळी 6.00 वाजता सिताराम उत्तमराव बोरुडे गेले असता चढ्या भावाने पेट्रोल विक्री चालु होती.(दि.22) केंद्र सरकारने तसेच (दि.23) रोजी राज्य सरकारने इंधनवर दरघट केली असताना सुद्धा सलग दोन दिवस 122 रुपये प्रमाणे पेट्रोल व 107.50 रुपये प्रमाणे पेट्रोल व डिझेल विक्री चालू होती.संबंधित संस्थेच्या व्यवस्थापकाला सिताराम बोरुडे यांनी विचारणा केली असता केंद्रात सरकार आमचे आहे.तुम्ही आमचे काही करु शकत नाही.नंतर मा.तहसिलदार साहेब यांना सिताराम बोरुडे यांनी संपर्क केला असता सायंकाळी 7.30 वाजता पाथर्डी महसुल अधिकारी मा.सानप साहेब व त्याच्या सहकार्याने रितसर पंचनामा केला.तरी संबंधित संस्थेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.सामान्य ग्राहकांना न्याय द्यावा.अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल.व दोन दिवसात केलेली लूट घेतलेल्या रीडींग प्रमाणे संस्थेकडून वसीली करण्यात यावी.अशी विनंती निवेदन देऊन सिताराम उत्तमराव बोरुडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,बंडु पाटील बोरुडे,योगेश रासने,चंद्रकांत भापकर,देवा पवार,गणेश वायकर,अक्रम आतार,गाडे सर,वैभव दहीफळे,एम.पी,आव्हाड इतर पदाधिका-यानी मा. तहसिलदार पाथर्डी यांच्याकडे मागणी केली आहे.