सरपंचाला ग्रामपंचायतीत देव दिसला पाहीजे.- मा. सरपंच भास्कर पेरे
By Admin
सरपंचाला ग्रामपंचायतीत देव दिसला पाहीजे.- मा. सरपंच भास्कर पेरे
पाथर्डी- प्रतिनिधी
सरपंच हा साधासुधा माणुस नसतो. संतांना कर्मामधे देव दिसत होता तसेच सरपंचाला ग्रामपंचायतीमधे देव दिसला पाहीजे.गावचा विकास करण्याची क्षमता सरपंच पदामधे असते.
अभ्यास करा, शासनाच्या योजना समजुन घ्या. जे करायचे ते मनातुन करा. संघटीतपणे केलेले चांगले कार्य तुम्हाला आदर्श सरपंच बनवु शकते. महिलांना पंचायतीच्या कारभाराची संधी द्या. शांतता, संयम व बुद्धी यांच्या समन्वयातुन महीला गावचा कारभार बचतीने व काटकसरीने करतील असे प्रतिपादन आदर्श गावचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी केले.
पाथर्डी येथील आप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृहात पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील नुतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार आमदार मोनिका राजळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे होत्या. यावेळी ते बोलेत होते.
पेरे म्हणाले, तुम्हाला काय येते हे महत्वाचे नाही. तुम्ही किती जणाला सोबत घेवुन चालता त्यावर तुमची प्रगती अवलंबुन असते. जनतेला काय करायचे नाही हे सांगण्यात वेळ घालु नका काय करायचे हे सांगा व गावची प्रगती करा. वेद, धार्मिक ग्रंथ माणसाला लवकर कळतात. ग्रामपंचायत सोपी नाही.
मी पंचवीस वर्षे सरपंच राहीलो मला अर्धी ग्रामपंचायत समजली. त्यामुळे तुम्ही भरपुर फिरा सरकारच्या योजना समजुन घ्या. महीलांना संधी द्या मला महिलांनी पाठींबा दिल्याने मला चांगले काम उभे करता आले. महिलामधे संयम, शांतता व बुद्धी असते. जगात सर्वात उत्तम व्यवस्थापक म्हणुन महिलांनाच पहीली पसंती आहे.
बचतीची सवय आणि इतरांचे चांगले करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये अधिक असते. आमदार खासदार आपला विकास करतील या भ्रमात राहु नका. मुळ प्रश्न सोडवा. लोकांना सोबत घेवुन काम करा गावचा विकास करता येतो.
खुप पर्यटन करा. अभ्यास करा व मन लावुन करा जे कराल ते चांगलेच असेल.यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, माझा उद्या वाढदिवस असल्याने मला कोणीही हार , तुरे , फेटे देवु नयेत. ज्याला सत्कार करायचा आहे त्यांनी वह्या व पुस्तके द्या त्याचा उपयोग गरीब विद्यार्थ्यांना होईल .