इगतपुरी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा आहुर्ली येथे उत्साहात सुरु
By Admin
इगतपुरी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा आहुर्ली येथे उत्साहात सुरु
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील आहुर्ली येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शालेय तालुकास्तरीय 14 वर्षे,17 वर्षे ,19 वर्षे वयोगटातील स्पर्धा (दि.23) सुरू झाल्या. स्पर्धेकरिता तालुक्यातील विविध शाळा-काॕलेमधून 24 संघ यांनी सहभाग नोंदविला. तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लोकनेते गोपाळरावजी गुळवे प्रणित संस्थेच्या कार्यवाह सौ. सुनीताताई गुळवे, संस्थेचे सचिव व एन डी एस टी सोसायटी चेअरमन बाळासाहेब ढोबळे ,स्कूल कमिटीचे चेअरमन रघुनाथ खातळे, तालुका क्रीडाप्रमुख विजय सोनवणे सर, अमोलराजे म्हस्के, शिंदे सर, पवार सर, थोरात सर, अहिरे सर, कासार सर , मुख्याध्यापक डी.एस. ठाकरे,तेलोरे सर,योगेश वाघ,ए.के.पाटील,डी.पी.अहिरे,कडाळी सर,ए.बी.तांबे,ए.पी.चव्हाण तसेच विविध शाळातील क्रीडा शिक्षक व कोच मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात खेळाचा आंनद घ्यावा.तसेच आपल्या कलागुणांना वाव द्यावा.विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षकांना आदर्श मानून त्याच्याकडून विविध कलागुण मिळवून शिक्षण घ्यावे.असे मत व्यक्त करत विद्यार्थी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी आलेल्या सर्व क्रिडा शिक्षकांचा गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व सामने खूपच चुरशीचे व अटीतटीचे झाले. यामध्ये 14 वर्षाआतील मुलांच्या संघातील विजयी संघ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहुर्ली व द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल वैतरणा नगर 17 वर्षाआतील मुलांच्या अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल आहुर्लीचा प्रथम क्रमांक आला व एमपी विद्यालय मुकणेचा द्वितीय क्रमांक आला. तसेच 19 वर्षे वयोगटात केपीजे काॕलेज इगतपुरी व द्वितीय क्रमांक गोंदे विद्यालय (सिद्धिविनायक) यांचा द्वितीय क्रमांक आला.या सर्व खेळाडूना खो-खो क्रिडा स्पर्धेत प्रथम ,द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपञ देण्यात आले. सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. खो-खो स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सुरेश शिंदे,दगडू तेलोरे,थोरात बाळासाहेब,अनिल गोडसे,कासार सर,सखाराम बर्डे,भगवान डोळस, दत्तू अहिरे,पत्रकार आणि क्रीडा शिक्षक अमोल म्हस्के,अनिल पाटील,पवार सर,योगेश वाघ,ढेरिंगे सर,कडाली सर,आणि आहुर्ली शाळेचे क्रीडा शिक्षक आणि खो खो संयोजक श्री उशीर सर,यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले. स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे 14 वर्ष मुले प्रथम-न्यू इंग्लिश स्कूल आहुर्ली द्वितीय- वैतरणा इंग्लिश स्कूल ,वैतरणा 17 वर्ष आतील मुले प्रथम-न्यू इंग्लिश स्कूल ,आहुर्ली द्वितीय-एम.पी.जी.विद्यालय, मुकणे 19 वर्ष मुले प्रथम-के. पी.जी.कॉलेज,टाके घोटी द्वितीय- श्री सिद्धिविनायक विद्यालय, गोंदे दुमाला सर्व यशस्वी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील स्पर्धा साठी शुभेच्छा सर्व शिक्षकांनी दिल्या.

