महाराष्ट्र
पोलिस असल्याचे सांगून लुबाडणार्या इरानी टोळीला शेवगाव तालुक्यातील 'या' व्यक्तीना अटक
By Admin
पोलिस असल्याचे सांगून लुबाडणार्या इरानी टोळीला शेवगाव तालुक्यातील 'या' व्यक्तीना अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आम्ही पोलिस आहोत, पुढे वातावरण खराब आहे. तुमच्याकडील दागिणे काढून ठेवा, असे सांगून सिंदी (मेघे) येथील अशोक मरडवार (78) याला लुटणार्या तोतया पोलिसांच्या इराणी टोळीला वर्धा पोलिसांनी अहमदनगर- शेवगाव व औरंगाबाद येथून अटक केली.
त्यांच्याकडून लुटलेले सोन्याच्या दागिण्यांसह कार व अन्य साहित्यासह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Iranian Gang मिळालेल्या माहितीनुसा, 9 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास स्थानिक पाषाण चौकात दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अशोक मरडवार याला थांबवत पोलिस असल्याची बतावणी करुन सध्या वातावरण बेकार आहे असे सांगून अंगावरील 45 हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ, 30 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या दुचाकीच्या हुकाला लटकवुन असलेल्या पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यानंतर वृद्धास बोलण्यात गुंतवून पिशवीतील सोन्याचे दागिणे काढुन ते दोघेही फरार झाले. मरडवार याने दिलेल्या तक्रारीवरुन वर्धा शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
Iranian Gang तपास चक्र फिरवत असताना पोलिस स्टेशन वर्धा शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन गुन्ह्यातील अली रजा उर्फ अली बाबा शब्बीर बेग ईराणी (47) श्रीरामपूर जि. अहमदनगर, शेख शाहरुख रईस (28) रा. शेवगाव जि.अहमदनगर, रियाज रशीद शेख (35) विहा मांडवा जि. औरंगाबाद आणि अविनाश गायकवाड (29) रा. शेवगाव जि. अहमदनगर यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. चोरट्यांकडून सोन्याचा गोफ, सोन्याच्या दोन अंगठ्या असा मुद्देमाल तसेच 6 लाख रुपये किमतीची कार, 1 लाख 20 हजार रुपये किमतीची दुचाकी, 4 मोबाईल 50 हजार असा 8 लाख 45 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Iranian Gang ही कार्यवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधीकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशान्वये पो.उप निरीक्षक सलाम कुरेशी, सचिन इंगोले, दीपक जंगले, अविनाश निंबाळकर, अमोल लगड, हमीद शेख, चंदू बुरंगे, श्रीकांत खडसे, दिनेश बोधकर, मनिष कांबळे यांनी केली.
Tags :
111717
10