खड्डे चुकविताना तरुणाचा अपघात, करंजी येथील घटना
महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव येथील एक तरुण पुणे येथून स्पर्धा परीक्षा देऊन शेवगाव कडे येत असताना मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याचा करंजी गावाजवळ महामार्गावरील खड्डे चुकविताना अपघात झाला.
या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर जखमी अशितोष जोशी (राहणार शेवगाव) हा तरुण बराच वेळ महामार्गावर पडलेला होता.
काही वेळाने देवराई व तिसगाव येथील युवक नगरहून तिसगावकडे जात असताना त्यांनी या मोटारसायकल स्वराचा अपघात झाले पाहिले. त्यानंतर लगेच त्याला पुढील उपचारासाठी अंकुश पालवे, शुभम मेहेर, अक्षय हवाले, सोमनाथ करूद, अविनाश काळे, प्रशांत कांबळे यांनी मदत करत त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर जांब कौडगाव, करंजी, देवराई, तिसगाव, निवडुंगे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून या खड्डयांमुळे दररोज अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत.
महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.