महाराष्ट्र
1125
10
फॉरेनची पाटलीण' चक्क शेतात करतेय कांदा पेरणी! सासू झाली खूश
By Admin
फॉरेनची पाटलीण' चक्क शेतात करतेय कांदा पेरणी! सासू झाली खूश, नेटकरी आश्चर्यचकीत!
फॉरेनची पाटलीन शेतात करतेय कांदा लागवड,
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
प्रेम हे आंधळे असते, प्रेमाला सीमा नसते, अशातच आजकाल लोकं परदेशी मुलींशीही (Foreign Daughter In Law) लग्न करण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसत आहे.
तसं पाहायला गेलं तर, भारतीय मुलं परदेशी मुलींशी लग्न करून परदेशात स्थायिक होत असल्याचे सामान्यतः दिसून येते. पण परदेशी मुली लग्नानंतर आपल्या पतीसोबत भारतात राहण्यासाठी आल्याचे क्वचितच पाहायला मिळते, सध्या सोशल मीडीयावर (Social Media) असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही 'फॉरेनची पाटलीण' म्हणजेच परदेशी सून आपल्या प्रेमासाठी (Love Story) केवळ भारतातच नाही, तर इथल्या शेतातही राबताना दिसत आहे. शेतात ती चक्क कांदा पेरणी करत असल्याचे दिसत आहे.
परदेशी सून शेतात पेरतेय 'देशी स्टाईल' मध्ये कांदा
ही परदेशी सून 'देशी स्टाईल' मध्ये शेतात कांदा पेरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या परदेशी सुनेने भारतीय कपडे घातले आहेत, तसेच भांगेत सिंदूरही भरला आहे. ती शेतात आरामात बसून कांद्याची पेरणी करत आहे. तिला शेतात काम करत असल्याचे पाहून तिचा नवरा येतो आणि तिला 'तुला काही विचारू का' म्हणतो, ज्याच्या उत्तरात ती हिंदीत 'हो नक्की' असं म्हणते. मग नवरा तिला विचारतो 'तू कुठली आहेस', तर ती म्हणते 'मी जर्मनीची आहे' आणि इथे शेतात कांदे लावत आहे. मग नवऱ्याने थट्टा करत तिला सांगितले की, 'तू सातासमुद्रापार जर्मनीहून भारतात कांदा लावायला आली आहेस', तेव्हा बायकोही आनंदाने 'हो' म्हणते. ती असेही म्हणते की तिला मजा येत आहे, खूप छान वाटत आहे. यादरम्यान दूर उभ्या असलेल्या परदेशी सुनेचे उत्तर ऐकून सासूही आनंदी होऊन हसताना दिसते.
तुम्ही अनेकदा विदेशी मुलांमुलींचा देसी लुक बघितला असेल. खरं तर भारतातील मुलं परदेशात शिकायला जातात आणि तेथून विदेशी सुन घेऊन येतात, असे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सोशल मीडियावरही याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.
कांद्याची लागवड करताना मजा येत असल्याचे ती महिला म्हणते. या दरम्यान दूर उभी असलेली जर्मन सुनबाईची सासू हसताना दिसत आहे.
प्रेमाला मर्यादा नसतात. प्रेम कधी, कुणावर जडेल हे सांगू शकत नाही. भारतीय मुलांमध्ये परदेशी शिक्षण किंवा नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परदेशी मुलींशी प्रेम विवाह होत आहेत.
भारतीय संस्कृतीची क्रेझ जगभरात आहे. यामुळे भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडलेल्या परदेशी मुली भारतीय मुलांना जोडीदाराच्या रुपात पसंती देताना दिसत आहेत. तसे पाहता, भारतीय लोक परदेशी मुलींशी लग्न करून परदेशात स्थायिक होत असल्याचे सामान्यतः दिसून येते. परदेशी मुली पतीसोबत रहायला भारतात आल्याचे क्वचितच पाहायला मिळते. सध्या एका फॉरेनच्या पाटलीनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही परदेशी सून भारतात शेतात काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही परदेशी सून हिंदीही सहज बोलत आहे.
Tags :

