महाराष्ट्र
याञेनिमित्त कावडीने पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या युवकांना टेम्पोची धडक; अपघातात दोन ठार दोन जखमी
By Admin
याञेनिमित्त कावडीने पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या युवकांना टेम्पोची धडक; अपघातात दोन ठार दोन जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा : श्रीक्षेञ बहिरवाडी (ता.नेवासा) येथील याञेनिमित्त पाणी आणण्यासाठी चाललेल्या युवकांना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने जोराची धडक देवून दोन जण या अपघातात जागीच ठार करुन अपघातातील टेम्पो चालकाने दुसऱ्या कावड वाटसरुंना वाचविण्यासाठी महामार्गाचे रस्ता दुभाजक पार करुन आऊट साईटला टेम्पो गेल्याने पुन्हा औरंगाबादकडून नगरकडे येणाऱ्या टेम्पोवर टेम्पो धडकून झालेल्या विचिञ अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना प्रवरासंगम शिवारातील हॉटेल हिंदुस्थान नजिक गुरुवारी राञी १०:३० वाजेच्या सुमारास घडली
पोलिस सुञांकडून मिळालेली अधिक सविस्तर माहीती अशी की, गुरुवार (दि.१४) रोजी राञी १०:३० वाजेच्या सुमारास बहिरवाडी (ता.नेवासा) येथील याञेनिमित्त कावडीने पाणी आणण्यासाठी प्रवरासंगमच्या दिशेने चाललेल्या दोन युवकाला हॉटेल हिंदुस्थान समोर पाठीमागून येणाऱ्या ४०७ टेम्पो (क्र.एम.एच.१४ ए.झेड ७३६५ ) जोराची धडक दिली
याबाबत पोलिस सुञांकडून मिळालेली अधिक सविस्तर माहीती अशी की, गुरुवार (दि.१४) रोजी राञी १०:३० वाजेच्या सुमारास बहिरवाडी (ता.नेवासा) येथील याञेनिमित्त कावडीने पाणी आणण्यासाठी प्रवरासंगमच्या दिशेने चाललेल्या दोन युवकाला हॉटेल हिंदुस्थान समोर पाठीमागून येणाऱ्या ४०७ टेम्पो (क्र.एम.एच.१४ ए.झेड ७३६५ ) जोराची धडक दिली या अपघातात कावडधारी युवक सचिन बाळासाहेब कडू (वय २१,रा.खलालपिंप्री) ता.नेवासा हा जागीच ठार झाला तर अक्षय अर्जून आढागळे या युवक या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे पाठीमागून येणाऱ्या टेम्पो चालकाने दोन जणांना उडवून दुसऱ्यांना वाचविण्यासाठी नगरकडून - औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या या टेम्पोने रस्त्याचे दुभाजक तोडून समोरुन नगरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोला (क्र.एम.एच.१६ सीसी २७८७) जोराची धडक दिली यामध्ये रस्ता दुभाजक पार करुन धडक देणारा टेम्पो चालक कडू नामदेव जाधव (वय ५७, रा.गणेशवाडी) ता.गंगापूर
जि.औरंगाबाद हा या अपघातात जागीच ठार झाला तर दुसरा टेम्पो चालक गोरक्षनाथ पुंडलिक दहिफळे (रा.राघूहिवरे ता.पाथर्डी) या अपघातात जखमी झाला आहे
या अपघाताचे वृत्त समजतात नेवासा पोलिस ठाण्याचे पो.नि.बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरासंगम दुरक्षेञ चौकीचे पोलिस हवालदार ससाणे यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारुन जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले होते माञ उपचारापुर्वीच जखमींचे निधन झाल्यामुळे शवविच्छेदन करुन मृत्युदेह ताब्यात देण्यात आले याबाबत भाऊराव मच्छिंद्र कडू यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी अपघातास कारणीभूत झालेल्या मयत चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला आहे
अपघाताचे वृत्त समजतात नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरासंगम दुरक्षेत्र चौकीचे पोलिस हवालदार ससाणे यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारुन जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच जखमीचे निधन झाल्यामुळे शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत नेवासा पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.
Tags :
4743
10