मूकबधिर विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप
पाथर्डी- प्रतिनिधी
आमदार मोनिकाताई राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीने आज मा. उपसभापती विष्णूपंत अकोलकर यांच्या संकल्पेतून अनाथ मुकबधीर शाळेच्या विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. दरवर्षी आमदार मोनिकाताई राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीने या अनाथ व मुकबधीर विद्याथ्यासोबत हि मंडळी मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतात.
म्हणून ज्या मुलांना या जगात कोणीच नाही आईची व वडीलाची माया यांना कधीच भेटू शकत नाही, या निरागस मुलासोबत हि दिवाळी साजरी केली.
यावेळी बोलताना विष्णूपंत अकोलकर यांनी अनाथ मुलांचे निरागस चेहरे पाहुण ज्या लोकांना फराळाची गरज नाही अशा मोठ्या लोकांना काही मंडळी फराळाचे आमत्रंन देतात पण या मित्रमंडळीने ज्या मुलांना चांगलंचुंगल गोड धोड जेवन भेटत नाही ज्यांना खरच भुक आहे अशासोबत दिवाळी साजरी केली जाते या पेक्षा दुसरा आनंद नाही.
याप्रसंगी शिवाजी राव मोहीते पाटील सचिन वायकर , नामदेव,मामा लबडे, नितीन एडके, जमीर आतार, प्रताप एकशिंगे ,संदीप पवार निलेश काळे दत्ता अकोलकर व मित्रमंडळी उपस्थित होते.