आ. मोनिका राजळे यांना मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण मंत्रीपदाची संधी द्यावी- पद्माताई टकले
पाथर्डी- प्रतिनिधी
आगामी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शेवगाव- पाथर्डी तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मोनिका राजीव राजळे यांना महिला व बालकल्याण मंत्री म्हणून निवड करावी, अशा मागणीचे निवेदन शिवछावा संघटना पाथर्डी महीला तालुकाध्यक्षा पद्माताई टकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की ,सध्या महाराष्ट्रामध्ये शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. तरी या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने आपणांस या पत्रात द्वारे कळविण्यात येते की, आमचा पाथर्डी- शेवगाव मतदार संघ हा अनेक दिवसापासून मंत्रीपदापासून वंचित आहे. तरी तालुक्याच्या एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून श्रीमती मोनिकाताई राजीव राजळे ह्या एक कर्तव्यदक्ष अशा आमदार आहेत व त्यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्रीपदीची आपण संधी द्यावी, अशी मागणी आम्ही सर्व शिवछावा संघटना महिला आघाडी पाथर्डी तालुक्याच्या वतीने करत आहोत. तरी या पत्राचा आपण विचारपूर्वक निर्णय घ्याल, अशी आशा आहे.
शेवगाव पाथर्डी मध्ये विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांना मंत्रिपद दिल्याने नक्कीच त्याचा फायदा तालुक्याबरोबरच राज्याला देखील होईल. अशी आशा आम्हास वाटते. तरी लवकर होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये आमदार राजळे मंत्री असतील, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करत आहोत.
निवेदनावर तालुकाध्यक्षा पद्माताई टकले, तालुका उपाध्यक्षा अश्विनीताई गोरे, ज्योती कासार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.