गुन्हेगाराचे वय 23 वर्ष अन् ६ बायका, २५ मुलं-मुली, ४४ गुन्हे; 'या' तालुक्यातील फरार आरोपीला केले जेरबंद
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी २३ वर्षीय संदीप ईश्वर्या भोसले या आरोपीवर तब्बल ४४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसंच ३ वेळा मोक्काअतंर्गत कारवाई केलेला हा आरोपी फरारी होता.
२३ वर्षीय संदीप भोसले याला सहा बायका असून 25 मुलं-मुली असा त्याचा संसार आहे. संदीप भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर, पुणे, सातारा, बीड व औरंगाबाद येथे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, बेकायदेशीररित्या हत्यार अशा प्रकारचे एकूण गुन्हे दाखल आहेत. तसंच अहमदनगरला एक, बीडला एक व पुणे एक असे तीन जिल्ह्यात तीन मोक्काअंतर्गत गुन्हे आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी विविध गुन्ह्यांत वांटेड आरोपी संदीप ईश्वर्या भोसले याला नगरच्या पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यात जेरबंद केले.
२६ गुन्ह्यात तो फरारी होता. यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने शोध सुरू करुन आरोपींला अटक करुन तपास सुरु केला आहे. संदीप ईश्वऱ्या भोसले याला सहा बायका असून सुमारे पंचवीस मुलं-मुली असा त्याचा संसार आहे. अनेक वर्षांपासून तो फरार होता.