Breaking-डॉक्टरांवरील हल्ल्याचा मेडिकल असोसिएशनकडून निषेध;काळ्या फिती लावून कामकाज
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निलेश म्हस्के यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने शेवगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. काळ्या फित लावून एक दिवशीय कामकाज करणार असल्याचे मेडिकल असोसिएशन वतीने सांगण्यात आले.
यावेळी शेवगाव शहरातील सर्व मेडिकल असोसिएशनचे डॉ. मनोज पाचरणे, डॉ. दिनेश राठी, डाॅ. प्रदीप उगले, डॉ. अमित फडके, डॉ. विकास बेडके, सागर बैरागी, डॉ. मुकूंद दारकुंडे, डॉ. मयुर लांडे, डॉ. रामहरी सातपुते, डॉ. संदीप येंडे, डॉ योगेश फुंदे, डॉ संजय लड्डा, डॉ पुरुषोत्तम डॉ बिहाणी, डॉ मनोज पुरनाळे, डॉ दिपक वैद्य, इत्यादी मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निलेश म्हस्के यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने शेवगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदारांना निवेदन
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. निलेश म्हस्के यांच्यावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये डॉ. निलेश म्हस्के जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. या समाजकंटकांवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी, डॉक्टरांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी शेवगाव तालुका मेडिकल असोसिएशनच्यावतीने शेवगाच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.