महाराष्ट्र
भालगाव- हिरव्यागार शेतात जत्रा भरपूर बोंडांची;प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतात पीक पाहणी कार्यक्रम
By Admin
भालगाव- हिरव्यागार शेतात जत्रा भरपूर बोंडांची;प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतात पीक पाहणी कार्यक्रम
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात भालगाव येथील प्रगतशील शेतकरी गोवर्धन प्रल्हाद खेडकर यांच्या शेतातील पीक पाहणी कार्यक्रमाचे कोहिनूर कंपनीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भालगाव येथील मच्छिंद्रनाथ गडाचे मठाधिपती ह. भ. प. नवनाथ महाराज शास्त्री, माजी सरपंच अंकुश कासुळे, प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, अशोक नारायण खेडकर, रामदास खेडकर, पत्रकार राजेंद्र चव्हाण, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी प्रा. जयहिंद खेडकर, भालगावचे मान्यवर व पंचक्रोशीतील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात गोवर्धन खेडकर यांनी शेतकऱ्यांना माहिती देताना म्हटले की, कापूस शेतीचे योग्य नियोजन केल्यास एका झाडाला किमान १०० ते १५० कापूस बोंडे येतात. तसेच योग्य वेळेला योग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पादन मिळते, याची खात्री मी देतो.
प्रगतशील शेतकरी गोवर्धन खेडकर हे एक आदर्शवत शेतकरी आहेत. अपार कष्ट व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तम शेती करणारे प्रगतशील शेतकरी आहेत. ते स्वतः उच्च शिक्षेत असून शेतीवर जीवापाड प्रेम करणारे आहेत. त्यांना शेतीमध्ये अनेक वेळा नुकसान सोसावे लागले. निसर्गापुढे शेतकरी हतबल होतो, पण अशा परिस्थितीत शेती आणि शेतकरी वाचला पाहिजे, अशा विचारातून सतत शेतीमधून नवनवीन प्रयोग गोवर्धन खेडकर हे करत असतात.
आज त्यांच्या शेतामध्ये असणारे प्रत्येक पीक अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत. विविध बियाणे कंपनी गोवर्धन खेडकर यांच्या शेतावर येऊन कार्यक्रम ठेवण्याची मागणी करत असतात, जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कशी करावी, यासाठी पीक पाहणी व कंपनीच्या विविध बियाणांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाची मागणी करत असतात.
मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या कोहिनूर कपाशी बियाणे कंपनीचा पीक पाणी कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट व मोठा होता. हजारो शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते.
भालगाव परिसरातील शेतकऱ्यांनी अशीच प्रगती करून खचून न जाता नियोजनबद्ध शेती करण्याचा प्रयत्न करावा, पण त्याचबरोबर आपल्या मुलांना चांगले शिक्षण, उच्चशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे कसे राहता येतील, याचा प्रयत्न करावा, असेही शेवटी गोवर्धन खेडकर यांनी सांगितले.
Tags :
956
10