महाराष्ट्र
शेवगाव-14 मुली कुटुंबियांच्या केल्या पुन्हा हवाली प्रेमाच्या आणाभाका घेत घरातून झाल्या सैराट
By Admin
शेवगाव-14 मुली कुटुंबियांच्या केल्या पुन्हा हवाली प्रेमाच्या आणाभाका घेत घरातून झाल्या सैराट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातून 15 मुलेमुली गेल्या सहा महिन्यात प्रेमाच्या आणाभाका घेत घरातून सैराट झाले होते. विशेष म्हणजे त्यातील काही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
यातील 14 मुलींना पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना सुखरुप हवाली केल्या आहेत, तर 14 मुलांच्या गुलाबी स्वप्नांचा शेवट तुरुंगात झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी जाऊन विद्यालय, महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले-मुली प्रेमाच्या आहारी जातात. अगदी अडनिड्या आणि कोवळ्या वयात शिक्षण, करिअर, नातेसंबंधांचा विचार न करता घरातील किंमती वस्तु, रोख रक्कम, उसनवारीच्या आधारवर भवितव्याच्या कुठल्याही विचारांविना केवळ भावनेच्या भरात जोडीदार निवडून पळून जाण्याच्या घटनेने अनेक कुटुंबांना समाजात होणार्या बदनामीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.
बालपणापासून लहानचे मोठे करण्यात आई-वडिलांनी काय खस्ता? घेतल्या याचा तुसभर विचार न करता स्वताःच जोडीदार निवडण्याचे असे प्रकार क्षणात कुटुंबांला हदरुन टाकणारे आहेत. मुलीचे कल्याण करण्याच्या प्रयत्नात असलेला बाप अणि मुलगी सुखी संसाराची कर्ती होण्याची इच्छा असणारी आई आपल्या स्वप्नांचा भंग कसा झाला या विचाराणे सुन्न होतात, तर मुलगा शिक्षण घेऊन नौकरीला लागावा अथवा उत्तम व्यावसाईक बनावा, अशी उमेद मनात ठेऊन, त्याचा लाड करताना, तो केव्हा हाताबाहेर गेला या धक्याने सैरभैर झालेल्या आई वडिल पुरते हेलावून जातात.
शेवगाव तालुक्यातून वर्षभरात जवळपास 15 लैला मजनुंच्या जोडप्यांनी अचानक धूम ठोकली. काही घरातून, तर काही शाळेतून 'सैराट' झाल्या आहेत. ही माहिती मिळताच कुटुंबियांनी पोलिस ठाणे गाठले आणि झालेल्या सर्व प्रकार सांगून आपला पाल्य हरविल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी रात्रंदिवस फिरून या लैला मजनुंचा शोध लावला. मुलींना आई वडिलांच्या हवाली केले, तर गुन्हा दाखल झाल्याने मजनुंना जेलमध्ये बंद केले. पळून गेल्याच्या बोभाट्याने आईचा पदर डोळ्यावर आला, तर बापाची मान खाली झाली. भाऊ मित्रांपासून बाजुला गेला, तर बहिणीला तिच्या विवाहाची चिंता सतावू लागली. दुसरीकडे पोलिसांनी शोध घेतलेल्या लैला घरी सुखरूप गेल्या; मात्र मजनुचे आयुष्य बरबाद झाल्याचे दुष्परिणाम घडला.
काही प्रकरणे दडपल्याची शंका
पोलिसात गुन्हे दाखल झालेल्या अशा घटने व्यतिरिक्त गवगवा होऊ नये यासाठी दडपल्या गेलेल्या अशा काही प्रकरणांची संख्याही अधिक आहे.
आई-वडिलांनो, हे करा होे!
आपले आई वडिल मुला-मुलींच्या भवितव्यासाठी कष्टाच्या घामात भिजत असतात. तरीही आईवडिलांच्या पिठावर रेघोट्या ओढणारे मुले-मुली किंमती वस्त्र परिधान करून हातात असणार्या मोबाईलमुळे शाळेत जाताणा वेगळीच शाळा करतात. यासाठी कुटुंबांचे मुलांमुलींवर बारकाईन लक्ष हवे. घरात कुटुंबात सुसंवाद आणि मोबाईल, सोशल मीडियापासून शक्य तेवढे दूर ठेवून मुलांमध्ये करिअरची आस्था निर्मान केल्यास पुढील नामुष्की नक्कीच टळू शकते.
Tags :
10111
10