महाराष्ट्र
वाळू लिलावातून मिळाला 'इतक्या' कोटींचा महसूल
By Admin
वाळू लिलावातून मिळाला 'इतक्या' कोटींचा महसूल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्यातील 12 वाळू लिलावासाठीचे पहिले टेंडर १४ जानेवारीला प्रसिद्ध झाले होते.
कुंभारी वाळू लिलावास सर्वोच्च किंमत मिळाली आहे. ९५ लाख १५ हजार तर मंजूर ११ लाख सात हजार ६०० रुपयांचा ठेका गेला. सहा लिलावांतून दीड कोटींचा महसूल जिल्ह्याला जमा झाला आहे.
राज्य सरकारने २८ जानेवारी २०२२ रोजी वाळू लिलावाच्या स्वामित्व धनात (रॉयल्टी) कपात करण्यात आली. सहाशे रुपये ब्रास रॉयल्टी ठेवली. त्यानंतर २५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. जेऊर पाटोदा सहा लाख ८७ हजार, वांगदरी आठ लाख ३१ हजार ४०० रुपयांना लिलाव गेला. ८ मार्चला तिसऱ्यांदा टेंडर प्रसिद्ध करण्यात आले. महालगावचा लिलाव २० लाख २२ हजार ६०० रुपयांना गेला आहे.
जिल्ह्यातील १२ पैकी सहा वाळू साठ्यांचे लिलाव ऑनलाईन पद्धतीने झाले. जिल्हा प्रशासनाला या लिलावातून १ कोटी ४६ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. कुंभारी (ता. कोपरगाव) वाळू लिलावाला सर्वोच्च बोली ९५ लाख १५ हजारांची तर सर्वात कमी मोर्वीश (ता. कोपरगाव) वाळू लिलाव ४ लाख ८२ हजार ८०० रूपये मिळाले आहेत, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी वसिम सय्यद यांनी दिली. ग्रामपंचायतीने सर्वसाधारण सभेत ठराव वाळू लिलाव करण्याचा ठराव केल्यानंतर ठरावाची प्रत जिल्हा प्रशासनाला दिली जाते. महसूल विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, शासकीय तंत्रनिकेतन विभाग यांचे संयुक्त पथक मोजणी करून उपलब्ध वाळू साठा जाहीर केला जातो. त्याआधारे गौण खनिज विभाग वाळू लिलावाची किंमत जाहीर करते.
वाळू ब्रास आणि लिलावाची किंमत याप्रमाणे
कोपरगाव तालुक्यातील सहा वाळू साठ्यांचा समावेश होता. त्यामध्ये गोदावरी नदीचे डाऊच खुर्द, कुंभारी, जेऊर पाटोदा, संवत्सर, मंजूर या पाच तर गोवी नदी पात्रातील मोर्विस असा सहा ठिकाणांच्या वाळू साठ्यांचा लिलावाचा समावेश करण्यात आला. श्रीगोंदे तालुक्यातील चार गावांतील वाळूचा लिलावाचा समावेश करण्यात आला. भीमा नदी पात्रातील अनगरे, घोडनदीतील काष्टी, वांगदरी, डोमाळवाडी याचा ठिकाणा समावेश होता. राहुरी तालुक्यातील दोन वाळू साठ्यांचा समावेश होता. मुळा नदीपात्रातील वळण आणि प्रवरा नदीपात्रातील महालगाव येथील वाळू साठ्याचा समावेश होता.
वाळूसाठा आणि हातची किंमत याप्रमाणे
डाऊच खुर्द (१२११) - सात लाख २६ हजार ६००, कुंभारी (३८७५) - २३ लाख २५ हजार, जेऊर पाटोदा (९९५) - पाच लाख ९७ हजार, मोर्विस - (६३८) - तीन लाख ८२ हजार ८००, संवत्सर -(९८५) - पाच लाख ९१ हजार, मंजूर (१०९६) - सहा लाख ५७ हजार ६००, अनगरे (३०२९) - १८ लाख १७ हजार ४००, काष्टी (२५२८) - १५ लाख १६ हजार ८००, वांगदरी (१३६९) - आठ लाख, २१ हजार ४००, डोमाळवाडी (११३६) - सहा लाख ८१ हजार ६००, वळण (३७४९) - २२ लाख ४९ हजार ४००, महालगाव (३३२१) - १९ लाख ९२ हजार ६००.
Tags :
233
10