महाराष्ट्र
जमीन व्यावसायिकास बेदम मारहाण
By Admin
तिसगाव- जमीन व्यावसायिकास बेदम मारहाण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी येथील जमीन व्यावसायिक कपिल अग्रवाल यांना जागेच्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चेन तोडून नेण्यात आली.
ही घटना शनिवारी दुपारी तिसगाव येथे घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून जयसिंग उर्फ जया भास्कर देशमुख, मंगेश उर्फ विजयसिंग भास्कर देशमुख (रा. तिसगाव, ता. पाथर्डी)या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या शेतीच्या बाजूस तिसगाव ते पाथर्डी रोडजवळ भास्कर रावसाहेब देशमुख (रा. तिसगाव) यांची जमीन आहे. देशमुख यांनी माझ्या मालकीच्या शेतातील रोडच्या बाजूची बाभळीचे झाडे काढून टाकून सपाटीकरण केले. शनिवारी दुपारी शेतात गेलो असता, तेथे जयसिंग देशमुख व त्याचा भाऊ मंगेश देशमुख हे होते. अग्रवाल त्यांना म्हणाले की, ही जमीन मी विकत घेतली आहे. तुम्ही माझ्या शेतातील बाभळीची झाडे काढून टाकून जमीन सपाट का केली? त्यावेळी देशमुख हे अग्रवाल यांना म्हणाले की, ही जमीन आमची आहे, तुझा येथे काय संबंध नाही, असे म्हणून अग्रवाल यांना शिवीगाळ करून वाद घातला.
त्यानंतर अग्रवाल व त्यांचे मित्र यांनी तिसगाव येथील एका वेल्डिंगच्या दुकानात सदर जमिनीचे खरेदीखत देशमुख यांना दाखविले. ते खरेदीखत पाहून त्यांना त्याचा राग आला. अग्रवाल यांच्या अंगावर धावून येत त्या जमिनीशी तुझा काही संबंध नाही, हे कागदपत्र आम्हाला काही मान्य नाही, तू काहीही करशील, असे म्हणून अग्रवाल यांना शिवीगाळ, दमदाटी करून, गचांडी धरून जयसिंग देशमुख याने अग्रवाल यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाची 70 हजार रूपये किंमतीची सोन्याची चून तोडून घेतली. तर, मंगेश देशमुख याने लाथाबुक्कयांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Tags :
94635
10