पाथर्डी- अल्पवयीन मुलीचा विनयभंग,धक्कादायक घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी – शहराच्या जवळच असलेल्या गावात किराणा दुकानात किराणा साहित्य आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी आरोपी महावीर उर्फ भावड्या सूर्यभान माळवे याचे विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, गावात काल दिनांक २२/१०/२०२२ रोजी सायंकाळी पिडीत मुलगी किराणा दुकानात किराणा आणायला गेली असता यातील आरोपी महावीर उर्फ भावड्या सूर्यभान माळवे याने पिडीतेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व तू जर तुझ्या वडिलांना सांगितले तर तुझ्या वडिलांना पाथर्डीत गाठून जीवे मारीन अशी धमकी दिली वगैरे मजकूर चे फिर्यादीवरून भा. द.वी. कलम ३५४,५०६ व बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षणाचा कायदा कलम ७,८,१२ प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लिमकर हे करत आहेत.