महाराष्ट्र
सहकार चळवळीमुळेच ऊस उत्पादकांना समृद्धी मिळाली-माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
By Admin
सहकार चळवळीमुळेच ऊस उत्पादकांना समृद्धी मिळाली-माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
नागवडे कारखान्याच्या 48 व्या गाळप हंगामाचा शुभारंभ
श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव(बाप्पू)नागवडे यांनी श्रीगोंद्या सारख्या दुष्काळी तालुक्यात सहकाराची मुहूर्तमेढ उभी केली, त्यातून कष्टकरी, शेतकरी, सभासद ऊस उत्पादक यांना भरभरून समृद्धी मिळाली. असे माजी मंत्री पाटील यांनी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा सन 2022- 23 या वर्षीच्या गाळप हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते तसेच कारखान्याचे विद्यमान संचालिका सौ.मेघा संदीप औटी व संदीप रामभाऊ औटी,सरपंच शुभांगीताई जंगले व उदयसिंह जंगले या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गव्हाणेची विधिवत पूजा करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, नागवडे कारखान्यावर पाऊल ठेवताच सहकार महर्षी बापूंची आठवण व स्मृती पुढे उभी राहिली सहकार महर्षी बापूंनी तालुक्यातील दीनदलित, शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक ,कामगार यांच्या हितासाठी प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले, परंतु या कारखान्याचा कारभार पाहताना बापूंनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. त्यातून तालुक्याचे अर्थकारण वेगात फिरले. सहकारी साखर कारखान्याचा कारभार पाहत असताना काटकसर व पारदर्शकता या बाबी प्रशासन चालवताना समोर ठेवल्या. म्हणूनच हा कारखाना राज्यात नावलौकिकास पात्र ठरला. असे सांगून पाटील पुढे म्हणाले की, नागवडे कारखान्याच्या सभासदांना धन्यवाद दिले पाहिजेत, सहकार महर्षी बापू नंतर प्रथमच कारखान्याची निवडणूक झाली आणि पुन्हा सभासदांनी नागवडे कुटुंबावर प्रखर विश्वास ठेवला. या कारखान्याची व्यापती संचित नफा तीन कोटीच्या पुढे आहे. संचित नफा जर नसेल तर बँक मान्य करत नाही. परंतु या कारखान्याला ऑडिट वर्ग देखील" अ" मिळाला. या संचालक मंडळाचे देखील जमेच्या बाजू आहेत. असे सांगून पाटील पुढे म्हणाले की, कारखान्यावर 171 कोटीचे कर्ज असले तरी मात्र प्रत्यक्षात 70 कोटीचे कर्ज दिसून येते. त्यासाठी सभासद ऊस उत्पादकांनी अभ्यास केला पाहिजे. कारखान्याची स्थावर मालमत्ता जवळपास 400 कोटीची निर्माण झालेले आहे. सहकारी साखर कारखान्यांना केंद्र व राज्य सरकारच्या नियमावलीतून जावे लागते. सहकाराला निर्बंध असतात. असे सांगून पाटील पुढे म्हणाले की, कारखान्याची 48 वर्षांपूर्वीची अवस्था काय होती? आणि आत्ताची परिस्थिती काय आहे. याचा देखील सभासदांनी प्रामुख्याने अभ्यास केला पाहिजे. सहकारी साखर कारखान्यामुळे व्यापक चित्र निर्माण झालेले आहे. बीओटी तत्वावरचे प्रकल्प हा नागवडे कारखान्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन करायला हवे. असे सांगून पाटील आणखी पुढे म्हणाले की, कारखान्याचे उत्पादन ऊस भाव वाढीसाठी नागवडे कारखान्याला ऊस उत्पादक सभासदांनी ऊस देण्याची भूमिका घ्यावी. सहकाराला वरदहस्त असल्याशिवाय साखर धंदा चालत नाही. साखर कारखान्याचा संबंध सभासद ऊस, उत्पादक, शेतकरी ,कामगार, सभासद असा व्यवहारिक दृष्टिकोन असतो. चालू वर्षी दहा हजार ऊस हेक्टर क्षेत्र गाळपासाठी प्रत्येक ऊस उत्पादकांनी हेक्टरी 100% टनेज मिळवण्यासाठी आधुनिक पद्धतीने ऊस शेती आवश्यक आहे. ऊस उत्पादकांनी बियाणे बदल केला पाहिजे. शेतकी खाते अद्यावत करावे लागेल. उत्पादन वाढवणेसाठी संचालक मंडळाने गटवाईज ऊस उत्पादकांना शेती विभागाला बरोबर घेऊन मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. असे सांगून पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार अल्प दरात अर्थसहाय्य करत आहे. त्याचा देखील लाभ घेण्याची आवश्यकता असून, गाळप हंगाम यशस्वीतेसाठी पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार यांनी चालू वर्षाचा गाळप हंगाम यशसी्वी होण्या कामी नागवडे कारखाना प्रशासनाला शुभेच्छा व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणात नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यावेळी म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारी पुढे मोठे आव्हाने आहेत. त्या संदर्भात सहकारी साखर धंद्यापुढे अडचणी निर्माण होत आहेत. हार्वेस्टिंग साठी केंद्रांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे .आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर भविष्यात आता ऊस तोडणी करावी लागणार आहे. सभासदांनी कारखाना निवडणुकीत सहकार महर्षी बापूंचे विचार डोळ्यासमोर ठेवून विशेषता पुन्हा नागवडे कुटुंबावर विश्वास दाखवला. संचालक मंडळ या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील बापूनंतर आमच्यावर देखील जिव्हाळ्याचे प्रेम ठेवून वेळोवेळी सहकार्य करण्याची भूमिका घेतली, मार्गदर्शन केले ,सहकार मंत्री असताना सहकार चळवळीला माजी मंत्री पाटील यांनी अधिक बळ देण्याचे काम केले. संचालक मंडळाने वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण करून बापूंचे स्वप्न पूर्ण केले. चालू गाळप हंगामात नागवडे कारखाना सहा ते साडेसहा हजार गाळप कसे होईल, यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे. असे सांगून नागवडे पुढे म्हणाले की, काहीजण नागवडे कारखान्या संदर्भात वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने अर्ज देऊन या कामधेनूला अडचणीत आणण्याचे काम करत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे. ही कामधेनु सर्वांची आहे त्याकडे प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मागील ऊस गाळपाची उर्वरित रक्कम पंधरा तारखेपर्यंत ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा होणार आहे .असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की, यावर्षी दहा लाख गाळपाचे उद्दिष्ट कारखाना प्रशासनाने ठेवले असून ,जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देणार आहे. तर नवीन सभासदांना पुढील वर्षी साखर वाटप सह इतर सुविधा देणार असल्याचे नागवडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमास माजी आमदार राहुल जगताप, प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, नगराध्यक्ष शुभांगी ताई पोटे,सुरेखा लकडे, सरपंच शुभांगी जंगले, उदयसिंह जंगले, प्रेमराज भोईटे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे, अरुणराव पाचपुते,दादासाहेब औटी, सुदाम दांडेकर, सतीश मखरे,कर्मवीर साखर कारखान्याचे संचालक भूषण काळे, जाधव ,माणिकराव पाचपुते, धनसिंग भोईटे ,दिनकर पंदरकर, दत्तोबा कातोरे,प्रशांत दरेकर, कारखान्याचे आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक ,सभासद ऊस उत्पादक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी केले .सूत्रसंचालन संचालक सुभाषराव शिंदे यांनी तर आभार संचालक दादासाहेब नेटके यांनी मानले.
Tags :
4587
10