शेवगाव- वृक्षतोडीकडे वनाधिकाऱ्यांचा काणाडोळा;वनसंपदा धोक्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, मुंगी, सुकळी, बालमटाकळी, कांबी, लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे, चापडगाव, खामपिंप्री, गदेवाडी यांसह विविध गावांतील (Village) शिवारातून बेकायदेशीर वृक्षतोड अत्याधुनिक कटर मशिनचा वापर करून केली जात आहे.
रोज पाच ते सहा ट्रॅक्टर आणि टेम्पोच्या साह्याने लाकडांची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे.
बोधेगावसह परिसरात वृक्षांची बेकायदेशीर वृक्षतोड (Cut Tree) केली जाते. लाकडाने भरलेली वाहने रस्त्यावरून भरधाव वेगाने धावताना दिसतात. ही वाहने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शेवगाव तालुक्यासह पूर्व भागातील बोधेगाव, मुंगीसह आदी परिसरात बेसुमार वृक्षांची कत्तल सुरूच आहे. याकडे वन विभागाचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नसल्याने वन विभागाबाबत तीव्र नाराजी आहे. अवैध वृक्षतोड (Cut Tree)करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वृक्षप्रेमी, तसेच ग्रामस्थांकडून केली जात आहे.
शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील वनसंपदा धोक्यात आली आहे. त्यामुळे वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन वृक्षतोड त्वरित थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.