महाराष्ट्र
श्री तिलोक जैन विद्यालयाची दहावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
By Admin
श्री तिलोक जैन विद्यालयाची दहावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.या निमित्ताने विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे होते. इयत्ता दहावी चा निकाल शेकडा
९८.८१% लागला असून चि .कोळेकर सारंग सुनिल याने ९६.८० % गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. चि .शेळके प्रणव बप्पासाहेब या विद्यार्थ्याने ९५ % गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर मरकड कानिफनाथ राजेंद्र या विद्यार्थ्याने ९४.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे. या सह ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे २८ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी सचिव सतिश गुगळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यास करून ऑफलाईन परीक्षा दिल्या. प्रतिकुल परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी अतिशय नेत्रदीपक यश मिळविले आहे. ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे असे ही प्रतिपादन केले . तसेच संस्थेचे उपाध्यक्ष चंपालालजी गांधी व विश्वस्त डॉ . ललीतजी गुगळे यांनी देखील आपले विचार व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेळके प्रणव या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करतांना शाळेने विद्यार्थ्यांना कोरोना काळात शिक्षण तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्राचार्य आणि अध्यापक वर्गाचे आभार मानले.शाळा बंद असताना सुद्धा शिक्षकांनी गुगल मिट , टिचमिट या अॅप च्या मदतीने सर्व अभ्यासक्रम शिकविला.त्यामुळे आमच्यात परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण झाला असे मनोगत व्यक्त केले.
या समारंभासाठी संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी , सचिव सतिश गुगळे , खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त डॉ. ललित गुगळे, धरमचंद गुगळे , राजेंद्र मुथ्था, कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ.अभय भंडारी, विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड , उप प्राचार्य विजयकुमार छाजेड , पर्यवेक्षक विजयकुमार घोडके,दिलावर फकीर, विभाग प्रमुख सुधाकर सातपुते , कार्यालयीन प्रमुख महेंद्र राजगुरू या सह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य विजयकुमार छाजेड यांनी केले. सुत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी केले तर आभार पर्यवेक्षक दिलावर फकीर यांनी मानले.
Tags :
11574
10