महाराष्ट्र
975
10
अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला, नेमकं काय झालं..?
By Admin
अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला, नेमकं काय झालं..?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांचा ताफा अडवल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.
पवार आज अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखाना निवडणूक प्रचारासाठी आले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. अजित पवारांनी सीताराम गायकर यांचा प्रचार करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
अजित पवारांचा ताफा अडवल्यामुळे पोलिसांनी शेतकरी नेते दशरथ सावंत यांना ताब्यात घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी सावंत यांना ताब्यात घेतल्याचाही निषेध केला आहे. ताफा अडवणारे शेतकरी मधुकर पिचड समर्थक असल्याची प्राथमिक माहिती आहे. अजित पवार यांना व्यासपीठावर जाऊन थेट सवाल करण्याचा इशारा दशरथ सावंत यांनी दिला होता, त्यामुळे पोलीसांनी सभेपूर्वीच सावंत यांना ताब्यात घेतले.
कार्यकर्त्यांचा संताप
गायकर यांच्या प्रचारसभेसाठी अजित पवार जात असतानाच शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा उडवला. शेतकरी नेते दशरथ सावंत यांना अजित पवारांची भेट घ्यायची होती. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना हटकले. दशरथ सावंतांसह काही आंदोलकांना ताब्यातही घेतले. त्यामुळे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न अजित पवारांनी करुन पाहिला. मात्र, आम्ही डॉ. किरम लहामटे यांना निवडून दिले आहे. तुम्ही गायकरांचा प्रचार कसा काय करू शकतात, असा सवाल आंदोलकांनी केला.
साखर कारखान्याची निवडणूक सुरू
जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका नेहमीच गाजतात. अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या विरोधात गायकर यांनी रणशिंग फुंकले आहे. अजित पवार आज अकोले तालुक्यात ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. मात्र, ज्यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत, त्या सीताराम गायकर यांच्यावर पवारांनी कधीकाळी जहरी टीका केली होती.
पाऊस प्रचंडप्रमाणात सुरू असुन शेतकरी संकटात आहे. तरीही मंत्रीमंडळाची स्थापन नाही मग तुमच्या सत्तेचा उपयोग काय असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यात अगस्ति साखर करखान्याच्या निवडणुकित विचारला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आज अहमदनगच्या अकोले तालुक्यात सभा होती. आणि या ठिकाणी त्यांनी आपल्या शैलीत विरोधकांवर फटकेबाजी केली आहे.
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)