शेवगाव - 'या' गावातील तलाठ्यावर वाळू तस्कराचा बेदम मारहाण करत हल्ला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी शेवगाव – बोधेगाव रोडवर सोनविहीर फाट्यानजीक घडली. जखमी तलाठ्यास उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आरोपींना अटक होईपर्यंत शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या महसुल कर्मचारी संघटना व तलाठी संघटना यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील कामगार तलाठी (Talathi) बी. जे .अंधारे यांच्यावर वाळू तस्कराने प्राणघातक हल्ला करुन बेदम मारहाण केली.
बालमटाकळी येथून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडवून त्यावर कारवाई करण्यासाठी शेवगाव येथे घेऊन जाताना काही अज्ञात वाळू तस्करांनी गज, काठ्याने तलाठी (Talathi) पवार यांच्यावर हल्ला केला. जखमी पवार यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकार सोनाप्पा यमगर आज शेवगाव येथे वसुली बैठकीस आले होते. त्यामुळे ही घटना त्याच्याही निदर्शनास आली. कर्मचारी व तलाठी संघटनेने त्यांनाही निवेदन दिले. आपण याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.