आमदार शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतक-यांनी अहमदनगर संभाजीनगर महामार्ग राेखला
नेवासा - प्रतिनिधी
मुळा धरणात जायकवाडीसाठी (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यात येऊ नये अशी भूमिका घेत आज (गुरुवार) आमदार शंकरराव गडाख (mla shankarrao gadakh) यांनी आंदाेलन छेडले आहे.
आंदोलकांनी अहमदनगर संभाजीनगर महामार्ग (rasta roko at ahmednagar sambhajinagar highway) राेखला आहे.
नगर जिल्ह्यातील मुळा धरण समूहातून २०१० टीएमसी आणि प्रवरा धरण समूहातून ३०३६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयास नगर जिल्ह्यातून तीव्र विराेध हाेऊ लागला आहे. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण हाेऊ शकते अशी भिती व्यक्त हाेऊ लागली आहे. त्यातूनच शेतकरी देखील पाणी साेडण्यास विराेध करीत आहेत.