नॅशनल लेव्हल काॅम्पीटिशन स्पर्धेत पाथर्डीच्या विद्यार्थ्यांचे यश
अहमदनगर येथे यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून गुणगौरव
पाथर्डी प्रतिनिधी:
इन्स्पायर अक्याडमीच्या वतीने आयोजित नॅशनल लेव्हल काॅम्पीटिशन रविवार दि.२८ जाने.२०२४ रोजी अमरज्योत लाॅन्स,अहमदनगर येथे पार पडली. या स्पर्धेत पाथर्डीतील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे.
शिक्षिका सौ.संगीता खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डीतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. अवघ्या पाच मिनिटांचा वेळ देवून घेण्यात आलेल्या या परिक्षेत विद्यार्थ्यांनी शंभर पेक्षा जास्त गणिते सोडवत उज्वल यश प्राप्त केले.
या स्पर्धेत कु.स्वरा बिपीन खंडागळे हिने पाच मिनिटांत १७२ गणिते सोडवून चॅम्पियन होण्याचा मान मिळाला.तर गौरी सचिन काकडे (रँक दोन १४४), कु.अद्विता अमोल फुंदे (रँक दोन १३२), चि.श्रेयस अशोक शिंदे (रँक आठ १०४), कु.जिज्ञासा विक्रम हराळ ,(रँक आठ १०१), कु.अर्णवी सोमनाथ उनबेग (रँक आठ ९७), कु. प्रेरणा दत्तात्रय बोरूडे (रँक आठ ९५) यांनी विशेष प्राविण्य मिळवले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा ट्राफि देवून सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील ७२८ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे