खड्डय़ात कार उलटून दीड महिन्याच्या बालकाचा मृत्यू; सहाजण जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चालकाचा ताबा सुटल्याने कार खड्डय़ात उलटून दीड महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला असून, सहा प्रवासी जखमी झाले आहेत. पाथर्डी तालुक्यातील कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) राष्ट्रीय महामार्गावरील मानमोडी येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
कल्याण महामार्गावर मानमोडीच्या पुलाजवळ इर्टिगा वाहनाच्या अपघातात एका दीड महिन्याच्या चिमुकल्या बालकाचा मृत्यू झाला असून, सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
शुक्रवारी रात्री पाथर्डीहून निर्मल-कल्याण महामार्गाने नगरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना मानमोडीच्या पुलाजवळ या कारचा अपघात झाला. अंकुश बाबुराव अडळकर (वय 45), सिताबाई अंकुश अडळकर (वय 42), गंगुबाई भुजंगराव देखमुख (वय 75), गंगुबाई बाबुराव अडळकर, (वय 70) पल्लवी नवनाथ देशमुख, (वय 14) रुपाली बालाजी देशमुख (वय 26) जखमींची नावे आहेत.
हे सर्व जखमी पुणे जिल्ह्यातील रहिवाशी आहे. शुक्रवारी रात्री इर्टिगा कार पाथर्डीहुन निर्मल-कल्याण राष्ट्रीय महामार्गाने नगरच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना, मानमोडीच्या पुलाजवळ कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये कार जावून आदळली. या अपघातात चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच, एकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच जखमींना स्थानिकांच्या मदतीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत चिमुकलीला नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू झाला आहे.