दादापाटील राजळे महाविद्यालयात "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
पाथर्डी- प्रतिनिधी
भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन पद्धतीने ताणतणावमुक्त परीक्षेच्या तयारी संदर्भात विद्यार्थ्यांना दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी मार्गदर्शन केले. पाथर्डी - शेवगाव विधानसभेच्या लोकप्रिय आमदार माननीय मोनिकाताई राजळे यांच्या समवेत बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांकरिता केले गेले होते . या कार्यक्रमाकरिता जिल्हा परिषद सदस्य राहुल दादा राजळे , श्री. भास्करराव गोरे ,श्री सचिन वायकर, सर्व स्टाफ व मोठ्या संख्येने विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते . हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना लवकरच संपन्न होणाऱ्या विविध परीक्षा करिता अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे . या कार्यक्रमाप्रसंगी माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता व त्यांच्या भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या . सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिलेला अनमोल संदेश घेऊन विद्यार्थी आपले भवितव्य उज्वल करतील व त्यांच्या हातून देशाची तसेच आपल्या परिसरातील जनतेची चांगल्या प्रकारे सेवा घडेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली. राहुल दादा राजळे यांनी देखील याप्रसंगी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर व सर्व स्टाफ उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या करण्याकरता सर्वांनी परीश्रम घेतले . डॉ.जालिंदर कानडे , डॉ. एम . एस . तांबोळी , प्रा. राजेंद्र इंगळे , प्रा. शामराव गरड , डॉ. बी.बी. टिळेकर , प्रा. चंद्रकांत पानसरे , प्रा . अशोक काळे , प्रा. अस्लम शेख, प्रा. गरड,प्रा. रविद्र फलके , डॉ. राजकुमार घुले , प्रा . एस व्ही . बडे , डॉ. एन. आर. काकडे डॉ. नेहूल डॉ. लवांडे, डॉ. साधना म्हस्के व इतर स्टाफ उपस्थित होते.