तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम जाहीर
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम साठी तालुकास्तरीय विशेष सभा आज शुक्रवार (दि.09) रोजी मुंढेगाव येथे तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयातील सर्व शिक्षक समवेत पार पडली आहे.सर्व शिक्षकासमवेत विविध विषयावर चर्चा झाली.या विशेष नियोजन सभेसाठी गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील साहेब , विस्तार अधिकारी मुंढे साहेब, तसेच तालुका विज्ञान अध्यापक संघ पदाधिकारी व सदस्य तसेच तालुक्यातील विज्ञान शिक्षक यावेळी उपस्थित होते.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुक्यातील मुंढेगाव येथील विद्यालयात दि.19- उपकरण नोंदणी , 20 - उपकरण प्रदर्शन व 21 - पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे.या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक,माध्यमिक ,उच्च माध्यमिक शाळांनी सहभागी होवून विद्यार्थ्यांना कला गुणांना वाव द्यावा.असे मत यावेळी गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले.