पाथर्डी पोलीस निरीक्षक डेरे यांची बदली;तर एपीआय राठोड सह बडे यांचे निलंबन
खून प्रकरणी हलगर्जीपणा भोवला
नगर सिटीझन live टिम-
पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाट्यावरील माजी सैनिक विश्वनाथ फुंदे यांच्या खून प्रकरणी फिर्याद घेण्यास हलगर्जीपणा केल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.तर सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व पोलीस नाईक शिवनाथ बडे यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे.