न्यू इंग्लिश स्कूल शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके प्रदान
पाथर्डी प्रतिनिधी:
राज्यात शैक्षणिक वर्ष सन २०२४- २५ करीता दि.१५ जून २०२४ रोजी या एकाच दिवशी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून गेले दीड महिना बंद असलेल्या सर्व शाळा मुलांनी गजबजून गेल्या. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात शालेय शिक्षकांच्या वतीने औक्षण व आरती ओवाळून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला कोरडगावचे सरपंच रविंद्र म्हस्के, प्राचार्य ठुबे, ग्रामपंचायत सदस्य अरुण मुखेकर, त्रिंबकराव देशमुख, नागनाथ वाळके, रमेश जोशी, बबनराव मुखेकर, नानासाहेब जाधव, प्रविण जाधव, विठ्ठल गोरे यासह कोरडगाव येथील ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गात नव्याने दाखल होणाऱ्या, शाळेच्या अन्य वर्गात देखील नव्याने दाखल होणाऱ्या सर्व मुलांचे शाळेच्या वतीने कुमकम तिलक लावून मनोभावे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व शालेय पाठ्यपुस्तके तसेच गोड पदार्थ मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.