वीज प्रश्नावरून रास्ता रोको आंदोलन
नगर citizen live team-
विद्युत महावितरणने वीज पुरवठा बंद करून शेतकर्यांकडून सुरु केलेली वसुली थांबवावी, शेतकर्यांना पुर्ण दाबाने अखंडितपणे दिवसातून आठ तास वीज पुरवठा करावा व शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने नगर- औरंगाबाद महामार्गावरील पांढारीपुल येथे शेतकर्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रस्त्यावर उतरलेल्या शेतकर्यांना काही वेळानंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस प्रशासनाने बाजूला घेऊन रस्ता रहदारी साठी मोकळा करुन दिला. या मागणीचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भाऊसाहेब बडे यांना देण्यात आले. शेतकर्यांचा वीज पुरवठा सुरळीत सुरु न झाल्यास आनखी तीव्र पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी दिला.