महाराष्ट्र
पर्स विक्रीवरून दोन गटात तुफान राडा, १२ जणांवर गुन्हा दाखल
By Admin
पर्स विक्रीवरून दोन गटात तुफान राडा, १२ जणांवर गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
संगमनेर शहरातील अशोक चौकात दोन गटामध्ये पर्स विकण्याच्या किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. तसेच याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जाणाऱ्या एकाला दुसऱ्या गटातील एकाने चॉपरने वार करून जखमी केले.
याबाबत दोन्ही गटांनी दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या तक्रारीवरून १२ जणांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीसात दंगलसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अशोक चौक येथे निखिल मुर्तडक व अशपाक खान या दोघांमध्ये बॅग विकण्यावरुन भांडण झाले. त्यानंतर त्यांच्यामध्ये समझोता झाला. रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास महेशनागरी पतसंस्थेच्या समोर उमेर मेहबूब पारवे आणि मित्र शहबाज पठाण, उजेर बागवान असे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे निखिल मुर्तडक, श्याम अरगडे, नयन मुर्तडक, सुनिल धात्रक, सागर (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर 5 ते 6 जण हातात लोखंडी गज, चाकु, लाकडी दांडके घेऊन आले. उमेर यास दुपारच्या भांडणाचा राग मनात धरुन शिविगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी त्या ठिकाणी उमेर याचा चुलत भाऊ सुफियान शेख व सोहेल शेख त्या ठिकाणी आले आणि उमेरला घेऊन तक्रार देण्यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला निघाले. शहर पोलीस ठाण्याच्या जवळच
असणाऱ्या एका दुकानाजवळ उमेर यास अडवत तु आमच्या विरुध्द तक्रार देण्यास चालला आहे का? असे म्हणत एकाने चॉपरने उमरच्या डाव्या बाजुला पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर लगेच सलीम इनामदार यांनी त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत महेबुब इब्राहीम पारवे (रा. मोठी मज्जीद मागे, मोमीनपुरा) याने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून निखिल मुर्तडक, श्याम अरगडे , नयन मुर्तडक, सुनिल धात्रक, व सागर (पूर्ण नाव माहीत नाही) या पाच जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये सिंधू सुनील धात्रक यांच्या मालकीचे अशोक चौकात लेडीज पर्सचे दुकान आहे. या दुकानाच्या शेजारी आफाक खान याचे सुद्धा लेडीज पर्सचे दुकान आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुर्तडक हिचा भाचा निखील मुर्तडक आणि आफाक खान यांच्यात पर्स विक्रीच्या भावावरुन किरकोळ वाद झाला होता. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अत्तार पारवे, आश्पाक खान, मुसाहीत मासुफ खान, उमर मेहबुब पारवे, आफीज खान, चॅटी (पुर्ण नाव माहीत नाही), आफाक खान आणि इतर चार ते पाच इसम असे दुपारी झालेल्या भांडणाचे कारणावरुन धात्रक यांच्या घरात घुसले. आणि तुम्ही आमच्या भांडणात का पडलात? असे म्हणत पती सुनिल केशव धात्रक, भाचा निखील मुर्तडक या दोघांना त्यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या सोनाली शाम अरगडे व त्यांचे पती शाम आबासाहेब अरगडे, नणंद कमल राजेंद्र मुर्तडक हे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनीही लाथा बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच तुम्ही येथे धंदाच कसे करता? तेच पाहतो, अशी दमबाजी
केली. याबाबत सिंधू धात्रक यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अत्तार पारवे, आश्पाक खान, मुसाहीत मासुफ खान, उमर मेहबुब पारवे, आफीज खान, चॅटी (पुर्ण नाव माहीत नाही) आणि आफाक खान या सात जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे . याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करत आहे
Tags :
1012297
10