महाराष्ट्र
इगतपुरी आग प्रकरणात मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर; स्फोट होऊन भीषण आग
By Admin
इगतपुरी आग प्रकरणात मृतांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर; स्फोट होऊन भीषण आग
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात असलेल्या जिंदाल कंपनीत आज सकाळी स्फोट होऊन भीषण आग लागली.
आगीची दाहकता एवढी एवढी होती की, परिसरातील गावावरून हे आगीचे लोळ दिसत होते. आगीत जखमी झालेल्या दोघा महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत घटनास्थळी भेट दिली. तसेच जमखींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, स्थानिक आमदार यांनी देखील पाहणी केली. ज्वलनशील मटेरिअल असल्यामुळे आग भडकली. आपली यंत्रणा काम करत आहे. जखमींमध्ये दोनजण गंभीर आहेत. मोठ्या प्रमाणात आग भडकली, मी तेव्हा सगळ्यांशी संपर्कात होतो. आर्मी देखील इथे दाखल झालेली आहे. सध्या आग कंट्रोलमध्ये आहे. संपूर्ण आग विझवली जाईल", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान मृत महिलांच्या वारसांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तर जखमींवर योग्य उपचार होतील, त्याचबरोबर जखमींची सर्व खर्च सरकार करेल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्याचबरोबर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत एक हजारांहून अधिक कामगार काम करतात. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला.
स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीत अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीची माहिती समजताच अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. जवळपास गेली तीन तासांपासून या ठिकाणी स्फोट होत असून आतापर्यंत येथून 14 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
मात्र, यामध्ये दोघा महिलेचा महिलांचा महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर चार जणांचे प्रकृती गंभीर असून इतर नऊ जणांवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महा निरीक्षक बीजी शेखर पाटील यांनी दिली आहे.
Tags :
588519
10