महाराष्ट्र
11173
10
रिसॉर्टवर डॉक्टरांची हायप्रोफाइल पार्टी
By Admin
रिसॉर्टवर डॉक्टरांची हायप्रोफाइल पार्टी
अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावरील 'स्प्रिंग रिसॉर्ट'वर मंगळवारी (दि. १२) रात्री पोलिसांनी छापा टाकून चार नर्तकी, सहा डॉक्टर, फार्मसिस्ट, रिसॉर्टचालक, वेटर अशा १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून, नऊ जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी 'महाराष्ट्र हॉटेल उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष बाररूममधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंधक घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम
२०१६चे कलम ३, ८'नुसार गुन्हा दाखल केला आहे. रिसॉर्टचालक विशाल सुरेश शिर्के (वय ३६, रा. पसरणी, ता. वाई, जि. सातारा), वेटर उपेंद्र ऊर्फ कृष्णा दयावंत प्रशादकोल
(वय ३१, रा. स्प्रिंग व्हॅली रिसॉर्ट, कासवंड, ता. महाबळेश्वर; मूळ रा. पाती, ता. गुड, जि. रिवा मध्यप्रदेश), डॉ. रणजित काळे (वय ४३, रा. बाजार पटांगण, दहिवडी, ता. माण), डॉ. नीलेश नारायण सन्मुख (वय ३९, रा. लक्ष्मी मार्केट, ता. मिरज, जि. सांगली), फार्मासिस्ट प्रवीण शांताराम सैद (वय ४०, रा. आलडिया, महाळुंगे पाडळे, पुणे), डॉ. मनोज विलास सावंत (वय ४०, रा. जयवंतनगर, दहिवडी), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (वय
४०, रा. मलकापूर, कराड), डॉ. राहुल बबन वाघमोडे (वय ३१, रा. गोंदवले, ता. माण), हनुमंत मधुकर खाडे (वय ६५, रा. दहिवडी) अशा नऊ जणांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल उमेश रामचंद्र लोखंडे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे.
पाचगणीजवळच असणाऱ्या कासवंड गावातील 'स्प्रिंग रिसॉर्ट' मध्ये डॉक्टरांसमोर युवतींची तोकड्या कपड्यात
डॉक्टर, नर्तकी, रिसॉर्टचालकासह १३ जणांवर गुन्हा दाखल
आरोग्य क्षेत्रात खळबळ
पोलिसांच्या या कारवाईत सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांचा समावेश असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दहिवडी, कराड, मिरज, सातारा व पुणे येथील हे डॉक्टर आहेत, यामुळे या हायप्रोफाइल पार्टीची चर्चा दिवसभर सुरू होती.
बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाच करीत नृत्यासह पार्टी चालू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आँचल दलाल यांना मिळाली. त्यावरून साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करण्यात आले.
पोलीस पथक घटनास्थळावर पोहोचताच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाचगणी कासखंड येथील स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज येथील एक असे सहा ते सातजण वारूच्या नशेत नर्तकींसमोर झिंगत असतानाच पोलिसांना सापडले. छापा टाकला त्यावेळी
नर्तकी नाचत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत चार महिलांसह त्यांच्यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट, रिसॉर्टचालक अशा एकूण आठ जणाविरोधात कारवाई केली आहे.
सहभागी सर्वांनी संगनमत करून चार बारबालांना बीभत्स कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले. तसेच प्रिमायसेस परवान्याचे नूतनीकरण न करता रिसॉर्टमध्ये विना नोकरनामा चार महिलांना कामावर ठेवले असून, सदर बारबाला करत असलेले कृत्य हे किळसवाणे व लज्जास्पद असल्याने याबाबत सर्वांवर
पाचगणी कासवंडमधील एका रिसॉर्टवर गैरकृत्य सुरू होते. यावरून चालक-मालक, तसेच पर्यटकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पाचगणी पोलीस तपास करीत आहेत. याबरोबरच येणाऱ्या काळात आपण नाताळ आणि नववर्ष साजरे करणार आहोत. सर्व हॉटेल, रिसॉर्ट चालक, मालक आणि पर्यटकांनी याही काळात कायद्याचे पालन करून, कायद्याच्या चौकटीत राहून सर्व सण-उत्सव साजरे करावेत. असे झाले नाही, तर संबंधित लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- समीर शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा
पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने तपास करीत आहेत.
Tags :
11173
10





