महाराष्ट्र
सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन वाहनांचा भयंकर अपघात! पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
By Admin
सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन वाहनांचा भयंकर अपघात! पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नाशिक-सिन्नर महामार्गावर मोदरी घाटात सायंकाळी पाचच्या सुमारास तीन वाहनांच्या विचित्र अपघातात नाशिक येथील एका नामांकित महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
नाशिक येथील एका नामांकित महाविद्यालयामधील 8 ते 9 विद्यार्थी स्विफ्ट कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. सायंकाळी नाशिकला परतत असताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ त्यांच्या कारचे अचानक टायर फुटले.
त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडर वरून पलटी घेत सिन्नरकडे येणाऱ्या इनोवा व स्विफ्ट कारवर येऊन धडकली. यामुळे कारमधील हरीश बोडके, सायली पाटील, शुभम ताडगे व अन्य दोन (अद्याप नवे समजू शकले नाही) विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षी घायाळ, साहिल वरके, गायत्री फड व ईनोवा कारमधील सुनील दत्तात्रय दळवी व अन्य दोन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
काही जखमींना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात तर काहींना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे
नाशिक शहरानजीक (Nashik City) अपघातांची मालिका सुरूच असून बस अपघाताची (Bus Accident) थरारक घटना ताजी असतानाच आता सिन्नरच्या मोहदरी घाटात (Sinnar Mohadari Ghat) तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात जवळपास पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिक सिन्नर रस्त्यावरील मोहदरी घाटात भयंकर अपघात झाला असून एका वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यात जवळसपास पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची समजते आहे.
सिन्नर जवळील मोहदरी घाटात स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटल्याने ही कार डिव्हायडर तोडून कार पलीकडच्या लेनवर जाऊन दोन वाहनांवर आदळली. यात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व राहणार नाशिकचे असून एका लग्न सोहळ्यानिमित्त संगमनेरला गेले होते.
दरम्यान आज दुपारच्या सुमारास अपघात झाला असून अपघातानंतर घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली. यानंतर तातडीने माळेगाव एमआयडीसी पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले. यातील जखमींना सिन्नर रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
असा घडला अपघात
दरम्यान सिन्नरच्या बाजूंकडून नाशिककडे स्विफ्ट कार येत होती. यामध्ये चार जण प्रवास करत होते. मोहदरी घाटात आल्यानंतर कारचे टायर फुटले. टायर फुटल्याने स्विफ्ट कार डिव्हायदर तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली. दुसऱ्या लेनमधून प्रवास करणाऱ्या इनोव्हा आणि एका दुसऱ्या स्विफ्टला धडक दिली. अपघातानंतर टायर फुटलेल्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून अपघाताची दाहकता दिसून येत आहे. सद्यस्थितीत सर्व गाड्या मोहदरी घाटातून हलविण्यात आल्या आहेत. तर इतर गाड्यातील जखमींना रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Tags :
28003
10