महाराष्ट्र
30388
10
महाराष्ट्रात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय
By Admin
महाराष्ट्रात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्रतही 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) हा निर्णय घेण्यात आलाय.
दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आलीये. सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय. त्याचसाठी राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.
अयोध्येत 22 जानेवारी 2024 अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली होती. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र सरकारद्वारे 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानुसार अनुष्ठान देखील करण्यात येत आहे. बुधवार 17 जानेवारी रोजी कलश पुजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रामलल्लाच्या मूर्तीला गुरुवारी गर्भगृहात आणण्यात आले. रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात आणण्यापूर्वी विशेष पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हे अनुष्ठान 21 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. तसेच हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत समाप्त होणं अपेक्षित आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.
सलग चार दिवस सुट्या
हजरत मोहम्मद अली यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, 25 जानेवारी रोजी बँकेला सुट्टी असणार आहे. त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 26 जानेवारीला बँका बंद राहतील. 27 जानेवारी हा महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि त्यानंतर 28 जानेवारी रविवार आहे. 25 जानेवारी ते 28 जानेवारी असे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. 21 जानेवारीपासून पुढील आठ दिवस बँका फक्त 2 दिवस सुरू राहतील आणि 6 दिवस सुट्या असतील.
Tags :
30388
10





