शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर
अधिवेशनात चर्चा करणार -आमोद नलगे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट् राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे अधिवेशन सांगली येथे 8 जानेवारी रोजी होणार असून शिक्षकेत्तर बांधवांच्या अनेक प्रलंबीत प्रश्नांवर चर्चा करणार आहे. तसेच सकारात्मक चर्चा होऊन पुढील नियोजन दिशा ठरणार आहे तरी जास्तीत शिक्षकेत्तर कर्मचारी बांधव अधिवेशनास उपस्थित रहावे असे आव्हान शिक्षकेत्तर संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख आमोद नलगे यांनी केले आहे
या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्य कार्यकारणी अहोरात्र झटत असून या अधिवेशनात शिक्षकेत्तरांना पदोन्नती देणे,2019च्या नवीन आकृती बंधानूसार शिक्षकेत्तरांची नवीन भरती सूरू करणे ,अश्वाशित प्रगती योजना म्हणजे 10,20,30 लागू करणे अशा अनेक प्रलंबीत प्रश्नांवर चर्चा होऊन पूढील धोरण ठरणार आहे.तरी
अधिवेशनास जास्तीत जास्त शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनींनी उपस्थित राहून सहभागी व्हावे. असे आवाहन आमोद नलगे, विभागिय सचिव गोवर्धन पांडूळे,जिल्हा सचिव भानूदास दळवी,जिल्हा अध्यक्ष भिमाशंकर तोरमल आणि जिल्हा कार्यकारणीने केले आहे.